Download App

भावानेच उदय सामंतांचे हटवले बॅनर! म्हणाले, काय करायचं हे मी ठरवणार

कोकणात राजकारण तापलं. किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांचे बॅनर हटवले. उदय सामंत यांच्या कार्यालयावरील त्यांचेच बॅनर हटवले.

Kiran Samant Banner :  रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये उमेदवारीचा प्रश्न मार्गी लागला असला तरी तेथील नाराजीनाट्य काही संपलेलं दिसंत नाही. या नाराजी नाट्यामध्ये आता बॅनरबाजीवरून नव राजकारण समोर येत असल्याचं दिसत आहे. भावानेच उदय सामंत यांच बॅनर हटवलं असून कोकणात नक्की काय सुरू आहे असा प्रश्न समोर येत आहे.

 

नाराजीनाट्य कायम

सामंत बंधू रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभेची जागा आपल्याला मिळावी यासाठी प्रयत्नात होते. परंतु, अनेक प्रयत्नानंतरही ती जागा काही सामंत बंधूंना मिळाली नाही. ती जागा भाजपच्या वाटल्या गेली. तिथे आता नारायण राणे हे महायुतीकडून लोकसभेच्या रिंगणात आहेत. परंतु, लोकसभा उमेदवारीपासून सुरू झालेलं नाराजी नाट्य आजही कायम असल्याचं कोकणात चित्र आहे.

 

नव राजकीय नाट्य

आपल्याला लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी इच्छूक असलेले उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत आणखीही नाराज असल्याचं चित्र आहे. आज किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी माळनाका नक्षत्र गार्डन येथील कार्यालयावरील मंत्री उदय सामंत यांचे फोटो हटवले आहेत. त्यामुळे या राजकीय नाट्याला वेगळच वळण मिळाल्याची चर्चा आहे.

 

काय म्हणाले किरण सामंत?

माझं कार्यालय आहे. तिथेच मी बसणार आहे. माझ्या कार्यालयात काय करायचं हे मी ठरवणार अशी प्रतिक्रिया किरण सामंत यांनी दिली आहे. तसंच, शिवसेनेच जिल्हा संपर्क कार्यालय हे माझ्या मालकीचं आहे असंही किरण सामंत म्हणाले आहेत.

follow us