Bird Flu : राज्यात बर्ड फ्लूचा धोका दिवसागणिक वाढू लागला आहे. मुंबई आणि ठाण्यातील काही भागात या आजाराचा परिणाम जाणवू लागला आहे. ठाणे महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून कोपरी परिसरातील चिकन आणि मटण विक्रीची दुकाने 5 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोकणातील उरणमध्येही या आजाराची प्रकरणे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. लातूरमध्ये तर एका पोल्ट्री फार्ममधील 4200 पिल्लांचा अचानक मृत्यू झाला आहे.
चीनमधूनच का पसरतात जीवघेणे व्हायरस? जाणून घ्या 4 धक्कादायक कारणे
उरणमधील चिरनेर गावातील एका पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लू ग्रस्त कोंबड्या आढळून आल्या. यानंतर आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आली. एक हजार पक्षी मारण्यात आले. तसेच एका ग्रामस्थाच्या पोल्ट्रीत मृत पडलेल्या देशी कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तपासणी अहवालात इन्फ्लूएंझाची खात्री झाली आहे. यानंतर येथे पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.
मराठवाड्यातील लातूरमध्येही या आजाराचा धोका वाढत आहे. येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये चार हजारांपेक्षा जास्त पिल्लांचा अचानक मृत्यू झाला. ही पिल्ले पाच ते सहा दिवसांची होती. त्यांचा मृत्यू झाला. प्रशासनाने या मृत पिल्लांचे नमुने घेऊन राज्य पशू रोग निदान प्रयोगशाळेत पाठवले आहेत. या नमुन्यांची तपासणी सुरू आहे. अहवाल आल्यानंतर या पिल्लांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला याची माहिती मिळेल. याआधी जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात बर्ड फ्लूमुळे 60 कावळ्यांचा मृत्यू झाला होता.
bird flu : चीनमध्ये नव्या व्हायरसचा कहर, 56 वर्षीय संक्रमित महिलेचा मृत्यू
AVIAN फ्लू किंवा बर्ड फ्लू एक व्हायरल संक्रमण आहे जे एका पक्ष्यातून दुसऱ्या पक्ष्यात फैलावते. संक्रमित कोंबडी किंवा अन्य पक्ष्यांच्या अगदी जवळ राहिल्याने हा आजार फैलावतो. विशेषतः कोंबड्यांच्या विविध प्रजातींच्या थेट संपर्कात आल्याने हा आजार माणसांतही फैलावतो. माणसांमध्ये हा व्हायरस तोंड, नाक आणि डोळ्यांच्या माध्यमातून पसरतो. या आजाराचे अनेक स्वरूप प्रदीर्घ काळापासून जगात समोर आले आहेत. पण सध्या प्रचलित असलेला H5N1 सन 1996 मध्ये पहिल्यांदा चीनमध्येच आढळून आला होता.