Download App

Nana Patole : इर्शाळवाडीच्या घटनेतून बोध घेत गाडगीळ समितीच्या शिफारशी मान्य कराव्या

  • Written By: Last Updated:

Irshalwadi landslide : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे बुधवारी रात्री दरड कोसळली. काल मोठ्या प्रमाणात बचावकार्य केलं. कालच्या बचावकार्यानंतरही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा असून 50 ते 60 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज आहे. त्यामुळे आजही एनडीआरएफनेबचावकार्य केलं. या घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असून 100 जण बेपत्ता असल्याचा अंदाज आहे. दरम्यान, या घटनेवर आज पुन्हा एकदा नाना पटोलेंनी (Nana Patole) भाष्य केलं. गाडगीळ समितीच्या (Gadgil Committee) शिफारशी सरकारने मान्य करून त्यांची अंमलबजावणी करावी, आणि भविष्यातील दुर्घटना टाळाव्या, असं पटोलेंनी सांगितलं. (Nana Patole on Irshalwadi landslide accept the recommendations of the Gadgil committee)

आज विधानसभेत बोलतांना नाना पटोल म्हणाले, काल इर्शाळवाडीत आखो देखा हाल मुख्यमंत्र्यांनी मांडला. इर्शाळवाडीची घटना अत्यंत दुःखद आहे. मुख्यमंत्री शिंदे, गिरीश महाजन यांनी तिथं जाऊन मदत कार्य केलं. त्यांचे आभार. पण, मनुष्य कितीही मोठा झाला तरी निसर्ग माणसाला भारी पडतो, हेच कालच्या घटनेतून दिसून आलं. मागच्या काळातही अनेक घटना घडल्या. त्यावर चर्चा केली जाते. मदतही केली जाते. पण, अशा घटनांमध्ये निष्पाप लोकांचे जीव जातात. या लोकांना वेळीच सुरक्षित स्थळी नेले असते तर जीवितहानी झाली नसती, असं पटोले म्हणाले.

Maharashtra Assembly : भाजप आमदारांची फडणवीसांचे नाव घेत विधानसभेत नाराजी! 

पटोले म्हणाले, मनमोहन सिंग सरकारच्या काळात पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी माधवराव गाडगीळ समिती स्थापन केली होती. या समितीच्या शिफारशी मान्य केल्या असत्या तर ही दुर्घटना झाली नसती. गाडगीळ समितीने दिलेल्या अहवालाची आजपर्यंत अंमलबजावणी झाली का झाली नाही? असा सवाल करत सरकार केवळ तज्ज्ञांच्या समित्या स्थापन करते, त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करते पण त्यांची अंमलबजावणी करत नाही, इर्शाळवाडीसारख्या घटनांमधून काही बोध घ्यायला हवा. मात्र तसे होत नाही हे दुर्दैव असल्याचे पटोले म्हणाले.

दरम्यान, आपण पुरवणी बजेट मांडलं. आता गाडगीळ समितीच्या अहवाल केंद्राकडून मागवून त्या शिफारशी मान्य कराव्या, आणि त्याची अमंलबजावणी करावी. शिवाय, निसर्गीची छेडछाडी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असंही पटोलेंनी सांगितलं.

ते म्हणाले, इर्शाळवाडीत रेल्वेच्या पटरीचं काम चालू आहे. तिथं स्पोटकं लावल्या जातात. त्या स्पोटकामुळंही तिथल्या दरडीला हादरे बसलेले असू शकतात. त्यामुळं आपण विकासाच्या नावाखाली निसर्गाचा ऱ्हास करतोय. यासंदर्भात पर्यावरणाच्या संदर्भात सरकारने गांभीर्याने भूमिका घ्यावी, द

इर्शाळवाडीतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये मदत राज्य शासनाने केली. मात्र, महागाईच्या काळात ही रक्कम तोकडी आहे. त्यामुळं दहा लाख रुपयांची मदत त्यांनी केली पाहीजे. शिवाय, त्यांना कुठं नोकरी देऊन पुनर्वसन कण्याचाही विचार करावा, असं पटोले म्हणाले.

Tags

follow us