Download App

Maharashtra Assembly : पक्षाकडे असलेल्या खात्याचं काम होत नाहीत; भाजप आमदारांनी आळवला नाराजीचा सूर

प्रफुल्ल साळुंखे

( विशेष प्रतिनिधी)

गेल्या काही दिवसांपासून भाजपात गटातटाचे राजकारण उफाळून आले आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पक्षांतर्गत जिल्हाअध्यक्ष निवडीवरून भाजपात धुसपुस सुरु असल्याचं दिसतंय. हे होत असताना शिंदे गटाच्या आमदारांच्या निधीला प्राधान्य दिल्याची भावना उफाळून येत होती. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी झाल्याने भाजपात अनेक आमदारांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती.

आमची फाईल किमान तीन-तीनदा चेक केली जाते. एकनाथ शिंदे त्यांच्या आमदारांना रिमार्क देतात, असा सुर काही आमदारांनी लावला होता. ही चर्चा भाजपात दबक्या आवाजात होती. पण आता थेट आमदार आपल्या मतदारसंघासाठी सरकारला प्रश्न विचारत आहे.  आज दिवसभराच्या कामकाजांत दोन आमदारांनी आपली नाराजी भाषणातून मांडली.

https://letsupp.com/maharashtra/manipur-violence-yashomati-thakurs-criticism-of-atul-bhatkhalkar-70379.html

सकाळी औचित्यच्या मुद्द्यावर भुसावळ चे आमदार संजय सावकारे यांनी मुद्दा मांडला. ते म्हणाले, माझ्या मतदार संघातील दोन प्रश्नासंदर्भात बैठक झाल्या. पण त्यावर अजुन कुठलाही निर्णय झाला नाही. ते एवढ्यावर थांबले नाही. तर पुढे म्हणाले, देवेंद्रजी आपल्याच कार्यालयात बैठक झाल्या आहेत. हा निर्णय लवकर व्हावा अस थेट बोलून गेले. विषय हा सीआरपीएफच्या कँप विषयीचा  होता. वर्षभर पाठपुरावा करुनही हा विषय मार्गी लागत नसल्याने संजय सावकारे बोलतं होते. थेट देवेंद्र फडणवीस याना उद्देशून बोलत असल्याचे अनेक वर्षात ते पहिल्यांदा दिसत होते. यावर फडणवीस यांनी “बघू” अस सांगत सावकारे याना शांत केलं.

यानंतर लेट्सअप मराठी सोबत बोलत संजय सावकारे यांनी बाजू सावरली आहे. माझ्या मतदारसंघातील एसआरपीएफचे सेंटर रोहित पवार यांनी पळवलं. देवेंद्रजींकडे वर्षभर अनेकदा बैठक होत आहेत. पण निर्णय झाला नाही. माझा राग यंत्रणेवर होता, असं सावकारे यांनी सांगितले.

संध्याकाळी इर्शाळवाडी बाबत चर्चेच्या वेळी भाजपा आमदार भालदी यांनी या पाड्याचा बाबतीत मी दिड वर्ष झाले पाठपुरावा करत आहे . पण मार्ग निघाला नाही. यासारख्या अनेक आदिवासी पाड्याच्या बाबतीत मी पाठपुरावा करत आहे. माझ्या मतदार संघात चाळीस हजार आदिवासी मतदार आहेत. मला एक रुपया निधी मिळाला नाही, असे भाष्य केले. (खर तर अर्थ खाते हे देवेंद्र फडणवीस यांच्या कडे होते )

सहकाऱ्यांचे हात धरले,अर्धा डोंगर चढला अन्…; CM शिंदेंनी सांगितला इर्शाळगडावरील ‘आँखो देखा हाल’

तसेच मी कदाचित कोणत्याही गटात बसत नाही असा थेट संताप भालदी यांनी या ठिकाणी व्यक्त केला. त्यावर फडणवीस यांनी उभे राहत या मुद्दावर मंत्रिमंडळ बैठकीत आज चर्चा झाल्याची माहिती दिली.
पण थेट फडणवीस यांच्या अर्थखत्याने पैसे दिले नाहीत किंवा गृह विभागात बैठक होऊन प्रश्न मार्गी लागत नाही, हे रेकॉर्डवर आणण्याची आजची बहुदा ही पहिली वेळ आहे.

Tags

follow us