शाब्दिक चकमकीनंतर आमदार वैभव नाईकांच्या अंगावर राणे समर्थक धावले…

सिंधुदूर्गात जोरदार राडा झाल्याचं समजतंय. राणे समर्थक आमदार वैभव नाईक यांच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार घडला आहे. तसेच नाईक यांना धक्काबुक्की झाल्याची माहिती मिळतेयं. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर जोरदार व्हायरल होतं असून यावेळी भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसून आलंय. बच्चू कडूंच्या मनधरणीसाठी मुख्यमंत्री मैदानात, नाराजी दूर करण्यासाठी देणार ‘हे’ खास गिफ्ट […]

Rane Vs Vaibhav Naik

Rane Vs Vaibhav Naik

सिंधुदूर्गात जोरदार राडा झाल्याचं समजतंय. राणे समर्थक आमदार वैभव नाईक यांच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार घडला आहे.
तसेच नाईक यांना धक्काबुक्की झाल्याची माहिती मिळतेयं.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर जोरदार व्हायरल होतं असून यावेळी भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसून आलंय.

बच्चू कडूंच्या मनधरणीसाठी मुख्यमंत्री मैदानात, नाराजी दूर करण्यासाठी देणार ‘हे’ खास गिफ्ट

कुडाळ तालुक्यातल्या पावशी गावात नळपाणी योजनेच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमावेळी आमदार वैभव नाईक आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाल्याची माहिती मिळाली आहे.

शाब्दिक वादानंतर राणे समर्थ आणि भाजप कार्यकर्ते वैभव नाईकांच्या अंगावर धावले आहेत. यावेळी नाईक यांनी धक्काबुक्कीही झाली आहे.

लाचारांची स्वारी सिल्व्हर ओकच्या दारी; शिंदे गटानं उद्धव ठाकरेंना ललकारलं

दरम्यान, जोरदार राडा सुरु असल्याचं समजताच कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी मध्यस्थी करीत तणाव नियंत्रणात आणला आहे. मतदारसंघात भूमिपूजनासाठी आलेल्या आमदार नाईक यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून विरोध झाल्याचंही समजतंय.

Nana Patekar : मी नसिरुद्दीन शाहसाठी नवस केला… अन, माझा देवावरचा विश्वास उडाला!

राणे कुटुंबियांचे निकटर्तीय समजले जाणारे पप्या तवटे आमदार नाईकांच्या अंगावर धावले आहेत. तर नाईक समर्थकांनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली.

दरम्यान, कोकणात सध्या भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडाजंगी सुरु आहे. अशात आमदार वैभव नाईक यांनी राणे कुटुंबियांवर निशाणा साधला. ईडीच्या कारवाईवरुनही नाईक यांनी नितेश राणे यांच्यावर टीका केली.

Exit mobile version