बच्चू कडूंच्या मनधरणीसाठी मुख्यमंत्री मैदानात, नाराजी दूर करण्यासाठी देणार ‘हे’ खास गिफ्ट

बच्चू कडूंच्या मनधरणीसाठी मुख्यमंत्री मैदानात, नाराजी दूर करण्यासाठी देणार ‘हे’ खास गिफ्ट

प्रफुल्ल साळुंखे

( विशेष प्रतिनिधी)

Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा अयोध्या दौरा मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात पार पडला. या दौऱ्याची मोठी चर्चा देशभरात रंगली होती. मुख्यमंत्र्यांबरोबर आमदार खासदारांसह मंत्रिमंडळातील मंत्र्यांनीही अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनाला हजेरी लावली. मात्र या दौऱ्याची आणखी एका कारणाने चर्चा होती. ती म्हणजे बच्चू कडुंची गैरहजेरी. या दौऱ्यात बच्चू कडूंनी (Bachchu Kadu) पाठ फिरवली होती. त्यामुळे कडू नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. त्यानंतर आता बच्चू कडुंची नाराजी दूर करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तातडीची बैठक बोलावल्याची माहिती आहे.

अयोध्या दौऱ्याकडे पाठ फिरवणारे बच्चू कडू नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. नाराज असलेल्या बच्चू कडू यांची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री यांनी तातडीची बैठक बोलवली आहे. एका विधानसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र बैठक ही आगळी वेगळी भेट मुख्यमंत्री यांनी दिली आहे का? अशी चर्चा आता रंगली आहे.

Gulabrao Patil : त्यांच्याकडे दुसरे भांडवलचं नाही, गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळामधील सहकारी, आमदार खासदार हे अयोध्या दौऱ्यात गेले होते. या दौऱ्यात काहीनी दांडी मारली होती. त्यात बच्चू कडू दौऱ्यात नव्हते. यावर विरोधकांनी एकनाथ शिंदे याना चांगलाच घेरले होते. फडणवीस-शिंदे गटात वाद, बच्चू कडू नाराज या मुद्द्यांवर संजय राऊत यांनी देखील सरकारला घेरले होते. या वादावर पडदा टाकत बच्चू कडू यांनी स्वतः आपण नाराज नाही अस जाहीरपणे सांगितले.

शिंदे गट बाहेर पडताना बच्चू कडू याना कॅबिनेट मंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले होते पण त्याना ते अजूनही मंत्रीपद मिळालेले नाही. नवीन सरकार सत्तेत येऊन आठ महिने उलटून गेले तरीही मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे कडू नाराज असल्याच्या चर्चा अधूनमधून येतच होत्या. त्यातच अयोध्या दौऱ्यात त्यांची गैरहजेरी सर्वात उठून दिसली. त्यामुळे कडू यांची मनधरणी करण्याची वेळ आता खुद्द मुख्यमंत्र्यांवर आली आहे. बच्चू कडू यांना सामाजिक विशेष मंत्रालयाची निर्मिती करण्यात आली. त्याच बरोबर बच्चू कडू यांच्या दोन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यताही देण्यात आली.

Gulabrao Patil : त्यांच्याकडे दुसरे भांडवलचं नाही, गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

आता देखील बच्चू कडू नाराज असल्याचे समोर आले होते. याची मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घेतली. अवकाळी पावसाच्या नुकसानीचा पाहणी दौरा संपताच मुख्यमंत्री मुंबईत दाखल झाले. आज तातडीने बच्चू कडू यांच्या मतदारसंघातील विविध प्रश्नांसाठी बैठक बोलावली आहे. आज दुपारी मंत्रालायत तीन वाजता ही बैठक होणार आहे. अचलपूर मतदार संघातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी ही बैठक असेल. या बैठकीत बच्चू कडूंच्या मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागू शकतात.

मुख्यमंत्री शक्यतो जिल्ह्याची बैठक बोलावतात. एका मतदार संघातील बैठक बोलवण्यात स्वतंत्र वेळ दिला जात नाही. पण केवळ बच्चू कडूंची नाराजी दूर करण्यासाठी एका मतदारसंघाची बैठक बोलवली का? याविषयी चर्चा रंगली आहे. काहीही असो बच्चू कडू नाराज झाले की त्यांचे महत्व वाढते आहे हेच यावरून अधोरेखित होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube