Gulabrao Patil : त्यांच्याकडे दुसरे भांडवलचं नाही, गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (83)

Gulabrao Patil On Uddhav Thackery : चंद्रकांत पाटील यांनी काल बाबरी मशीद भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाडली असं वक्तव्य केलं होत. त्यावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले की बाबरी मशीद शिवसैनिकांनीच पाडली. त्यांना ते पटत नसेल तर चंद्रकांत पाटील यांनी लालकृष्ण आडवाणी यांचा व्हिडिओ ऐकावा, तो माझ्याकडे आहे, अशी पुष्टी देखील त्यांनी जोडली.

काल चंद्रकांत पाटील बाबरीच्या खंदकातून बाहेर पडले. जेव्हा बाबरी पाडली तेव्हा सगळे उंदीर बिळात होते. सध्याचे पंतप्रधान पण कुठेच नव्हते. तेव्हा बाळासाहेबांनी जबाबदारी स्वीकारली. बाळासाहेब म्हणाले हे कसले नपुंसक नेतृत्व. आता एक एक बिळातून बाहेर येतायत. अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

Chandrakant Patil : नाराजी नाही, राजीनामा घ्या; राऊतांनी शिंदेंना खडसावले

त्यानंतर मंत्री गुलाबराव पाटलांना उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर विचारले असता. तेव्हा त्यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधून सांगितले की, त्यांना रोज मंत्र्यांवर आरोप करण्याशिवाय दुसरा त्यांच्याकडे काहीच नाही. महाराष्ट्राकरिता काय केलं पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेसाठी काय केलं पाहिजे कोणत्या योजना राबवल्या पाहिजे कोणत्या घटकाकरिता काय केलं पाहिजे असा प्रश्न कधी ऐकायला आला नाही. मंत्र्यांवर आरोप करण्याशिवाय उध्दव ठाकरे यांच्याकडे दुसरा भांडवल काही नाही आहे. टीव्ही चॅनेलसुध्दा आम्ही बघणं बंद करून टाकलं आहे असे बोलून मीडियाला भटकारल. असं गुलाबराव पाटील यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

Tags

follow us