राज्यात सूर्यनारायणाचा प्रकोप… काय म्हणतंय हवामान खातं, वाचा

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत पुढील दोन दिवस राज्यातील कमाल तापमान वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. सरकार मस्तीत दंग, त्यांना शेतकऱ्यांचे हाल का दिसत नाहीत ? ; भुजबळांचा सरकारला सवाल तर, कोकणातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला […]

888

888

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत पुढील दोन दिवस राज्यातील कमाल तापमान वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

सरकार मस्तीत दंग, त्यांना शेतकऱ्यांचे हाल का दिसत नाहीत ? ; भुजबळांचा सरकारला सवाल

तर, कोकणातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मुंबईमध्ये देखील सातत्याने तापमानात वाढ होताना दिसत आहे.

राज्यातील सर्वच भागांत आता उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात झाल्याचं दिसतंय. अशातच आता कोकण पट्ट्यात आज आणि उद्या पारा चढणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

Sunil Tingre म्हणाले भाजपकडून पिंपरीला न्याय… तर पुणेकरांवर मात्र अन्याय!

सध्या राज्यात 30 अंश सेल्सिअस तापमान असून कोकणात मात्र, 5 ते 6 अंश सेल्सिअस तापमान वाढणार असल्याचा दावा हवामान विभागाकडून करण्यात आला आहे.

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्गसह रायगड, ठाणे, मुंबईत आज आणि उद्या उन्हाचा पारा चांगलाच वाढणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलंय. या जिल्ह्यांत पुढील तीन दिवसांत कमाल तापमानाची वाढ अपेक्षित असणार आहे.

Sunil Tingre म्हणाले भाजपकडून पिंपरीला न्याय… तर पुणेकरांवर मात्र अन्याय!

हवामान विभागाकडून साधारणपणे कमाल तापमानात 5 ते 6 अंश सेल्सिअस तापमानात वाढ होणार असल्याचं सांगितलंय. तर दुसरीकडे कोकणातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसणार असल्याचीही शक्यता वर्तवण्यात आलीय.

दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानूसार आता राज्यातील कोकण भागांत मोठ्या प्रमाणात उकाडा वाढणार असल्याचं दिसणार अशून कमाल तापमानात वाढ होणार आहे.

Exit mobile version