Download App

चोरीचा मामला अन् जोर-जोरात बोंबला; ठाकरेंची शिंदे गटासह भाजपवर जळजळीत टीका

Udhav Thackeray News : चोराला तरी लाज असते, पण यांचा चोरीचा मामला अन् जोरजोरात बोंबला, या शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी शिंदे गटासह भाजपला जळजळीत टीका केली आहे. दरम्यान, सध्या उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून आयोजित सभेत ते बोलत होते.

मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदचा पक्ष निवडणुकीच्या मैदानात, नातेवाईकांनाही उमेदवारी

उद्धव ठाकरे म्हणाले, अपात्र आमदार प्रकरणाच्या निकालात शिवसेना पक्षप्रमुख यांना माहित नाही, पक्षाची घटना नाही असा दावा करण्यात आला पण, हे सगळं 2014 ला माझा पाठिंबा घेताना माहित नव्हतं का? पंतप्रधानपदाच्या पत्रावर माझी सही घेतली तेव्हा नव्हतं माहित का? 2019 साली अमित शाह माझ्याकडे आले तेव्हा माहित नव्हतं का? तेव्हा मिंध्याकडे का नाही गेलात? चोराला तरी लाज असते पण तुमचं चोरीचा मामला अन् जोरजोरात बोंबला असं असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

गुजरातचे दहशतवादविरोधी पथक मुंबईत; अटक झालेले मौलाना मुफ्ती सलमान अझहरी कोण आहेत?

तसेच रत्नागिरीतल्या एका माजी आमदाराने बोर्ड लावला आहे. त्यावर असं लिहिलं की, ‘आनंद संकल्पपूर्तीचा आणि आरंभ रामराज्याचा’ याचा अर्थ आनंद संकल्पपूर्तीचा म्हणजे अयोध्येत मंदिर बांधलं आणि आरंभ रामराज्याचा म्हणजे भाजप आमदाराने पोलिस ठाण्यात गोळीबार केला ते रामराज्य म्हणूनच यांना मी हरामखोर म्हणत असल्याचंही उद्धव ठाकरे म्हटले आहेत.

विद्यापीठातील तोडफोड प्रकरणात पीएसआयवर निलंबनाची कारवाई; माहिती देण्यास दिरंगाई भोवली

पंतप्रधान मोदींवर टीका…
नाती सांगण्याची मला कधी गरज पडली नाही. चिपळूण हे माझं माहेरघर आहे. मेरे भाई और बहनो मेरा और चिपळूण का बहुत पुराना रिश्ता असं मी कधीच नाही म्हणलो. रिश्ता दीखानेवाला नहीं निभानेवाला चाहिए… अगर रिश्ता है तो निभाव, हे नूसते रिश्ते असतात पण संकटात जे सोबत येतात ते परिश्ते असतात. जनता माझी परिश्ता आहे. संकट नेहमी एक संधी घेऊन येत संकटाच्या छाताडावर चालून जातो, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे.

कमळाबाई हे नाव भाजपला बाळासाहेबांनी दिलं आहे. कमळाबाईला वाटलं की शिवसेना संपेल 2014 सालीच ते संपवायला निघाले होते. मोदी घराणेशाहीविरोधात टाहो फोडतात पण 2014 ला मीच पक्षप्रमुख होतो. मग तुम्हाला कोणाचा पाठिंबा घेतला होता. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींकडे तेव्हा मला का नेलं होतं. तेव्हा पंतप्रधान पदाच्या पत्रावर माझी सही का घेतली होती. अमित शाह यांनी 2018 साली पुन्हा युती करण्यासाठी का आले होते. मिंध्याकडे का नव्हते गेले? असा प्रश्नांचा भडीमार उद्धव ठाकरेंनी केला आहे

follow us