मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदचा पक्ष निवडणुकीच्या मैदानात, नातेवाईकांनाही उमेदवारी

मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदचा पक्ष निवडणुकीच्या मैदानात, नातेवाईकांनाही उमेदवारी

Pakistan News : 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या (Hafiz Saeed) बंदी घातलेल्या संघटनांचा नवा चेहरा ‘पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीग’ नावाचा राजकीय पक्ष पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणूक (Pakistan General Election) लढवत आहे. बीबीसी उर्दूने म्हटले आहे की या संघटनेने पाकिस्तानच्या विविध शहरांतून नामनिर्देशित केलेले काही उमेदवार हाफिज सईदचे नातेवाईक आहेत किंवा बंदी घातलेल्या लष्कर-ए-तैयबा, जमात-उद-दावा किंवा मिल्ली मुस्लिम लीगशी त्यांचे पूर्वीचे संबंध आहेत.

लाहोरमधील तुरुंगात बंद असलेल्या सईदला दहशतवादाला आर्थिक मदत केल्याच्या प्रकरणांमध्ये पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने 31 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. 10 डिसेंबर 2008 रोजी संयुक्त राष्ट्राने त्याला ‘जागतिक दहशतवादी’ घोषित केले होते.

गेल्या वर्षी 29 डिसेंबर रोजी भारताने दहशतवादी कृत्यामध्ये सहभागी असलेल्या सईदच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. आता भारताने सईदचा मुलगा हाफिज तल्हा निवडणूक लढवत असल्याच्या वृत्ताचीही दखल घेतली आहे. भारताने म्हटले की शेजारील देश दहशतवादी संघटनांना ‘मुख्य प्रवाहात आणण्याचे नवीन नाही, बर्याच काळापासून त्यांच्या सरकारी धोरणाचा हा भाग आहे.

मुलांना निवडणुकांच्या राजकारणात आणू नका; लोकसभांच्या तोंडावर EC च्या राजकीय पक्षांना सूचना

पाकिस्तानने लष्कर-ए-तैयबा, जमात-उद-दावा आणि त्यांच्याशी संलग्न पक्ष आणि संघटनांवर बंदी घातली आहे, यात खैर नास इंटरनॅशनल ट्रस्ट, फलाह इन्सानियत फाउंडेशन, अल-अन्फाल ट्रस्ट, खमताब खालक संस्था, अल- दावत अल-अर्शद, अल-हमद ट्रस्ट, अल-मदीना फाउंडेशन आणि मुआज बिन जबल एज्युकेशनल ट्रस्ट यांच्या समावेश आहे.

हाफिजचा मुलगाही निवडणूक लढवतोय
मरकझी मुस्लिम लीग हा सईदच्या जमात-उद-दावाचा नवा राजकीय चेहरा आहे. पक्षाच्या प्रवक्त्याने सईदच्या संघटनांशी संबंध असल्याचा इन्कार केला आहे. परंतु मिळालेल्या रिपोर्टनुसार सईदचा मुलगा हाफिज तलहा सईद हा मरकझी मुस्लिम लीग पार्टीच्या वतीने निवडणूक लढवत आहे, तो लाहोरमधील नॅशनल असेंबली-122 मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहे. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजचे नेते आणि माजी मंत्री ख्वाजा साद रफिक हेही याच जागेवरून निवडणूक लढवत आहेत.

‘क्राईम अन् सस्पेन्स…”मर्डर मुबारक’चा धमाकेदार टीझर रिलीज! ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित!

त्याचप्रमाणे सईदचा जावई हाफिज नेक हा प्रांतीय विधानसभा मतदारसंघ पीपी-162 मधून गुज्जर मरकझी मुस्लिम लीगच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे. याआधीही जमात-उद-दावाशी संबंधित काही लोकांनी 2018 मध्ये ‘मिल्ली मुस्लिम लीग’ पक्षाच्या वतीने निवडणुकीत भाग घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तत्कालीन सरकारच्या विरोधामुळे पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने या संघटनेवर बंदी घातली होती. नंतर त्यांचा नोंदणीचा ​​अर्ज फेटाळण्यात आला. अमेरिकेने ‘मिल्ली मुस्लिम लीग’वर बंदी घातली होती आणि त्यांच्याशी संबंधित सात जणांचा समावेश “जागतिक दहशतवाद्यांच्या” यादीत केला होता.

मरकझी मुस्लिम लीगने खंडन केले
आता यापैकी चार लोक पंजाब आणि सिंध विधानसभेत मरकझी मुस्लिम लीगच्या वतीने निवडणूक लढवत आहेत. मरकझी मुस्लीम लीगच्या प्रवक्त्या हंझाला इमाद म्हणाल्या, “आमचा कोणताही उमेदवार कोणत्याही बेकायदेशीर कृतीत गुंतलेला नाही आणि कोणत्याही बंदी घातलेल्या पक्षाचा भाग नाही.”

VD18 Teaser: वरुण धवनचा VD18चा धमाकेदार टीझर रिलीज; ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित!

follow us
  • fb
  • instagram
  • youtube