माजी आमदार कृष्णा हेगडे यांच्या बँक लॉकरमधून रिव्हॉल्वरसह दागिन्यांची चोरी

कर्नाटक बँकेच्या विलेपार्ले पूर्व शाखेतील लॉकरमधून माजी आमदार आणि शिवसेना नेते कृष्णा हेगडे यांची रिव्हॉल्व्हर आणि दागिने चोरी.

untitled design (48)

untitled design (48)

Krishna hegade bank locker gun stolen : कर्नाटक बँकेच्या विलेपार्ले पूर्व शाखेतील लॉकरमधून माजी आमदार आणि शिवसेना नेते कृष्णा हेगडे यांची रिव्हॉल्व्हर आणि दागिने चोरी झाल्याची घटना घडली आहे. कृष्णा हेगडे (krushna Hegade) आणि त्यांचे कुटुंबिय कर्नाटक बँकेत (Karnataka Bank) गेल्या 40 वर्षांपासून बँकिंग सुविधा घेत आहेत. 19 सप्टेंबर 2025 रोजी कृष्णा हेगडे यांनी बँकेच्या विलेपार्ले पूर्व शाखेत जाऊन आपल्या बँक लॉकरमध्ये (Bank Locker) मौल्यवान वस्तू आणि पैसे ठेवले होते. यानंतर 22 ऑक्टोबर 2025 रोजी ते पुन्हा बँकेच्या शाखेत गेले. त्यावेळी त्यांनी बँक लॉकर उघडला, तेव्हा त्यांना विसंगती आढळली आणि काही पैसे व मौल्यवान वस्तू गायब झाल्याचं दिसून आलं.

दरम्यान कृष्णा हेगडे यांच्या लॉकरमध्ये कुटुंबातील वारसाहक्क, त्यांच्या आईचे दागिने, त्यांची बचत, त्यांचे परवानाधारक रिव्हॉल्वर(Revolver), घड्याक, महत्वाच्या फाईल्स आणि काही पैसे होते. त्यामुळे घटनेची गंभीरता लक्ष घेता त्यांनी तात्काळ शाखा व्यवस्थापकांना चोरीची माहिती दिली. तसंच, याबाबत शाखा व्यवस्थापक मनीष कुमार, क्लस्टर व्यवस्थापक हरी सरीन आणि डीजीएम राजगोपाल भट्ट यांच्यासोबत मिटिंग घेतली. मात्र योग्य प्रतिसाद मिळाला नाही, असं कृष्णा हेगडे यांनी म्हटलं आहे. “या बँकेच्या अधिकाऱ्यांकडून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न झाला. गोदरेजच्या चावी बनवणाऱ्या कंपनीला बँकेच्या अंतर्गत दक्षता विभागाला कळवण्यात आलं. तसंच मी पोलीस तक्रार दाखल करू नये, यासाठी हे कळवण्यात आले. बँक अधिकाऱ्यांना फक्त हा मुद्दा दडपून टाकायचा होता,” असा गंभीर आरोप देखील कृष्णा हेगडे यांनी केला आहे.

बीड-वडवणी मार्गवर शनिवारी रेल्वे इंजिन धावणार, पुणे रेल्वे विभागाच्या नागरिकांना महत्वाच्या सूचना

बँकेच्या खालच्या स्तरावरील अधिकाऱ्यांना कोणताही अधिकार नसल्याचं लक्षात येताच ते फक्त प्रकरण लांबवत होते. त्यामुळे कृष्णा हेगडे यांनी 19 नोव्हेंबर 2025 रोजी आरबीआयकडे यासंदर्भात तक्रार केली. यानंतर कृष्णा हेगडे यांना संपूर्ण घटनेची चौकशी केली जाईल अशी माहिती आरबीआय लोकायुक्तांकडून देण्यात आली. बँकेच्या अधिकाऱ्यांकडून जवळजवळ एक महिना प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर कृष्णा हेगडे यांनी कर्नाटक बँकेच्या सीईओ आणि एमडी यांना पत्र लिहिलं. “मी कर्नाटक बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ राघवेंद्र भट यांना चोरींबाबत अनेक ईमेल पाठवले, पण त्याल्या कोणताही प्रतिसाद मिळाला नाही,” असं कृष्णा हेगडे यांनी सांगितलं.

याचबरोबर, “धक्कादायक म्हणजे, मी पाठवेलल्या ईमेलला फक्त ज्या बँक शाखेत चोरी झाली. त्याच शाखेच्या व्यवस्थापकाकडून उत्तर देण्यात आलं. त्यामुळं जर एखाद्या साधनसंपत्ती असलेल्या व्यक्तीसोबत असं घडू शकतं, तर सामान्य माणसाला त्यांच्याकडून कसा प्रतिसाद मिळेल, याबद्दल विचार करावा लागेल. अनेक नागरिक या बँक लॉकर्समध्ये आपले पैसे आणि दागिने सुरक्षित आहेत, असे समजून ठेवतात,” असंही कृष्णा हेगडे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, याबाबत कृष्णा हेगडे यांनी 27 नोव्हेंबर 2025 रोजी अतिरिक्त पोलीस आयुक्त (पश्चिम विभाग) परमजीत दहिया यांची भेट घेतली. तसंच इतर पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि चोरीबाबत तक्रार दाखल केली. विलेपार्ले पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Exit mobile version