Ahilyanagar News : अहिल्यानगर शहरातील सावेडी भागात रविवार 18 मे 2025 रोजी सायंकाळी 6.30 वाजता परमपूज्य आदिशक्ती श्री माताजी श्री निर्मला देवी (Shri Nirmala Devi) यांच्या परम कृपेने सहजयोग ध्यान साधनेचा आत्मसाक्षात्काराचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रचार समितीने दिली आहे.
श्री माताजी यांचे आजोळ हे अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) जिल्ह्याचे होते. त्यामुळे श्री माताजी यांनी बऱ्याच वेळा नवीन साधकांसाठी या ठिकाणी कार्यक्रम घेतले आहे. सावेडी 1987 मध्ये आदिशक्ती श्री माताजी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. याच भूमीमध्ये स्वतः श्री माताजी साकार रुपात असताना त्यांनी नवीन साधकांसाठी पब्लिक कार्यक्रम घेतला होता. तर आता बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा हा योग आला असून या कार्यक्रमाची प्रचाराची सुरुवात 15 ते 18 मे 2025 पर्यंत सावेडी परिसरात सहजयोगी बंधू भगिनी प्रचार प्रसार करुन 18 तारखेच्या कार्यक्रमाची पत्रिका वाटणार आहेत. तर या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सहजयोगी येणार असल्याची देखील माहिती महाराष्ट्र प्रचार समितीने दिली.
कार्यक्रमाबद्दल जाणून घ्या
महाराष्ट्र प्रचार समितीने दिलेल्या माहितीनुसार, शनिवार संध्याकाळी 7.00 वा. सहज भुवन आश्रम, गोविंदपुरा, अहिल्यानगर येथे अमरावती येथील सहजयोगी दलाल बंधू संदीप दलाल आणि मिलिंद दलाल यांचा भजन संध्याचा कार्यक्रम होणार आहे. तर 18 मे रोजी सकाळी 11 वा. सहजयोग्यांसाठी सेमिनार होणार आणि दुपारी 4.00 वाजता परमपूज्य माताजी श्री निर्मला देवी यांची भव्य मेगा रॅली खंडेलवाल भुवन, जॉगिंग ट्रॅक जवळ येथून निघून सपकाळ चौक, यशोदा नगर मार्ग पाईप लाईन रोड, भिस्तबाग चौक कुष्टधाम रोड, प्रोफेसर चौक मार्गे जॉगिंग ट्रॅक मैदान येथे येईल आणि सायंकाळी 6.30 वा अहिल्यानगर मधील साधकांसाठी भव्य पब्लिक प्रोग्राम कुंडलिनी शक्ती जागृतीचा कार्यक्रम होणार आहे.
जी. एस.महानगर बँक! सासू सुनेची जोडी निवडणुकीच्या रिंगणात
या कार्यक्रमासाठी सावेडी उपनगरसह अहिल्यानगरमधील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्रचार समितीच्या वतीने प्रा. नितीन पवार, अमोल यावलकर, श्रीनिवास बोज्जा, मेजर कुंडलिक ढाकणे व अमित बुरा यांनी केले आहे.