Ahilyanagar News: दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू, अहिल्यानगर हळहळलं

Ahilyanagar News: दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू, अहिल्यानगर हळहळलं

अहिल्यानगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातून एक काळीज पिळवटून टाकणारी दुर्देवी घटना समोर आली. नगर जिल्ह्यातील नेवासा (Nevasa) तालुक्यात शेततळ्यात बुडून दोन चिमुकल्यांचा बडून मृत्यू झाला. मयूर संतोष शिनगारे (वय 12) (Mayur Santosh Shingare), व पार्थ उद्धव काळे (वय 7) अशी शेततळ्यात बुडून मृत झालेल्या मुलांची नावे आहेत. दरम्यान, मन सुन्न करणाऱ्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

तालिबान सरकारचा अजब फतवा!; अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर घातली बंदी… 

नेवासा तालुक्यातील गेवराई येथे शनिवार (दि. 10) रोजी ही दुर्दैवी घटना घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेवराई येथील उद्धव काळे यांनी पंधरा दिवसांपूर्वीच त्यांच्या शेतात शेततळे बांधले होते. आणि दोन दिवसांपूर्वी त्या शेततळ्यात पाणी भरले होते. उद्धव काळे आणि त्यांच्या पत्नी शेतात मिरच्या तोडण्यात मग्न असतानाच मयूर संतोष शिनगारे, पार्थ उद्धव काळे ही दोन्ही मुले खेळता खेळता शेततळ्याकडे गेली. दोघेही पाण्यात उतरले. मात्र, त्यांना पोहता येत नव्हते. दरम्यान, बुडू लागल्याने त्यांनी आरडाओरडा केला. त्यांचा हा आरडाओरडा जवळच शेतात काम करणाऱ्या महिलांच्या कानी पडला. परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता.

मोठी बातमी! अजित पवारांचा पठ्ठा…दिपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखल 

सुमारे ४० फूट खोली असलेल्या शेततळ्यात दोघा मुलांचा बुडून मृत्यू झाला. दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोहणाऱ्यांनाही तिथपर्यंत पोहोचता आले नाही. अखेर शेवटी जेसीबीच्या मदतीने तळ्याचा भराव फोडण्यात आला आणि मुलांना बाहेर काढण्यात आले. त्यांना तात्काळ नेवासा फाटा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांचाही मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेमुळे गेवराई गावात शोककळा पसरली आहे.

नेवासा फाटा येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर गेवराई येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, यातील मयूर शिनगारे हा इयत्ता पाचवीमध्ये तर पार्थ काळे हा इयत्ता दुसरीमध्ये शिकत होता.

 

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube