मोठी बातमी! अजित पवारांचा पठ्ठ्या…दिपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखल

Police Filed FIR Against Deepak Mankar : अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दिपक मानकर (Deepak Mankar) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. बनावट कागदपत्रे सादर करुन पोलीसांची दिशाभूल केल्याचा ठपका (Pune Crime) मानकर यांच्यावर ठेवण्यात आलाय. पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे राज्य उपाध्यक्ष म्हणून काम करत असलेल्या शंतनू कुकडेला (Shantanu Kukde) पुणे पोलीसांनी काही महिलांच्या तक्रारीनंतर बलात्कार प्रकरणात अटक केली होती. याप्रकरणाचा तपास करत असताना यात अनेकांचा सहभाग असल्याचं आढळून आलं होतं. त्यानंतर शंतनू कुकडेच्या बॅंक खात्याची पोलिसांनी पडताळणी केली. यामध्ये शंतनू कुकडे अन् दीपक मानकर यांच्यात तब्बल एक कोटी रूपयांची देवाणघेवाण झाल्याचं आढळून आलं होतं.
Apurva Nemlekar : अपूर्वा नेमळेकरचा मनमोहक अंदाज, चाहते फिदा…
पुण्यात काही दिवसांपूर्वी एका परदेशी महिलेवरती लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शंतनू कुकडे या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान शंतनू कुकडे याच्या बँक खात्यावरुन कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे निदर्शनास आले होते. आरोपी शंतनू कुकडेचा जवळचा सीए रौनक जैन याच्या बँक खात्यामधून मानकर पिता-पुत्राच्या बँक खात्यामध्ये पावणेदोन कोटी रुपये आल्याची माहिती आहे.
पोलीस तपासात कुकडेच्या बँक खात्यात 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम पोलिसांना आढळून आली. त्यातील 40 ते 50 कोटी रुपये काहींच्या बँक खात्यावर पाठवण्यात आल्याचे निदर्शनास आले.यातील काही रक्कम मानकर यांच्या खात्यावर आली आहे. मात्र, हे सर्व आरोप मानकरांनी फेटाळून लावले होते. रौनक जैन याच्या बँक खात्यातून आमच्या बँक खात्यात पैसे आले आहेत. आमचा एका जमिनीचा व्यवहार आहे. तो रौनक याच्यासोबत झाला. त्याची कायदेशीर इसार पावती देखील झालेली आहे. शंतनू कुकडे याचे वैयक्तिक जीवन आणि त्याचे आर्थिक व्यवहार याच्याशी आमचा काहीही संबंध नाही, असे दीपक मानकर यांनी म्हटले होते. मात्र बनावट दस्त पोलिसात दिल्याचे कारण देत समर्थ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश गिते यांनी मानकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
त्यानंतर पोलिसांनी दीपक मानकर यांना यासंबंधी चौकशीसाठी बोलावलं. यावेळी मानकर यांनी शंतनू कुकडेसोबत कोणतेही आर्थिक व्यवहार नसल्याचा दावा केला होता. सोबतच पोलिसांसमोर काही कागदपत्रं सुद्धा सादर केली होती. पोलिसांनी कागदपत्रांची सत्यता तपासली. त्यानंतर ती कागदपत्रं बनावट असल्याचं आढळून आलं. पोलिसांनी बनावट कागदपत्रे सादर करून पोलिसांची फसवणूक केल्याप्रकरणी मानकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
दीपक मानकर यांच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचं दिसत आहे. ते पुण्याचे उपमहापौर देखील राहिले आहेत, परंतु मानकर नेहमीच वादग्रस्त ठरले आहे. याअगोदर देखील अनेक प्रकरणांत मानकर यांना अटक झाली असून ते तुरूंगात देखील गेली आहेत. अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत. दरम्यान आता त्यांच्या पक्षाच्या शहराध्यक्षावर गुन्हा दाखल झाला आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. समर्थ पोलीस ठाण्यात मानकरांविरोधात गुन्हा दाखल झालाय. पुढे काय कारवाई होते, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.