हो! भारताने आमचं फायटर जेट पाडलं, पाकिस्तानने खुलेआम दिली खळबळजनक कबुली…

हो! भारताने आमचं फायटर जेट पाडलं, पाकिस्तानने खुलेआम दिली खळबळजनक कबुली…

Pakistan Shot Down India IAF Rafale Jet Operation Sindoor : पाकिस्तानने भारताचे राफेल विमान पाडल्याचा दावा केला (Ind Pak War) जात आहे, याचं स्पष्टीकरण आता समोर आलंय. भारतीय सैन्याने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) मध्ये 100 दहशतवादी अन् पाकिस्तानी 30 ते 40 सैनिक मारले गेले, अशी माहिती लष्करी संचलनालयाचे महानिर्देशक (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिली.

रविवारी भारत आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील शस्त्रसंधीनंतर तिन्ही सैन्यदलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यांनी पाकिस्तानविरोधात राबवण्यात आलेल्या लष्करी मोहीमेची माहिती दिली आहे. दरम्यान काही परदेशी वृ्त्तसंस्था पाकिस्तानने भारताचे राफेल विमान पाडल्याचा दावा करीत आहेत. यासंदर्भात भारतीय वायूदलाचे एअर मार्शल ए.के. भारती यांना विचारण्यात आलंय.

भीषण अपघात! ट्रक आणि ट्रेलरच्या धडकेत 13 जणांचा मृत्यू, रायपूरमध्ये रस्त्यावर मृतदेहांचा खच अन् रक्ताचा सडा

यावर स्पष्टीकरण देताना एअर मार्शल ए.के. भारती यांनी म्हटलं की, भारतीय वायूदलाने त्यांचं उद्दिष्ट साध्य केलंय. परंतु भारताचं राफेल जेट पाकिस्तानने पाडलं का? यासंदर्भात त्यांनी थेट बोलणं टाळलं. भारताने त्युत्तराच्या कारवाईमध्ये पाकिस्तानचे अनेक ड्रोन्स आणि जेट्सला हिट केलं. तर आता पाकिस्तानी सैन्य दलानेच विमानाचं नुकसान झाल्याची कबुली दिल्याचं समोर आलंय.

पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते लेफ्टनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी प्रेस ब्रीफिंगमध्ये म्हटलंय की, भारतासोबतच्या संघर्षामध्ये एका पाकिस्तानी विमानाचं थोडं नुकसान झालेलं आहे. तर भारताचा कोणताही पायलट आमच्या ताब्यात नाही, या सगळ्या बातम्या चुकीच्या असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय.

Video : …तर काय उत्तर मिळेल हे पाकिस्तानला माहीत आहे; भारतीय नौदलाने ‘हवाच’ काढली

तर एअर मार्शल ए.के. भारती यांनी म्हटलं की, आपण सगळे युद्धजन्य परिस्थितीमध्ये आहोत. नुकसान हा लढाईचा एक भाग असतो. जर आम्ही राफेल विमानाबाबत काही सांगितलं तर शत्रूला फायदा होण्याची शक्यता आहे. आम्ही ठरवलेलं उद्दिष्ट साध्य केलंय. सगळे पायलट सुखरूप परतले आहे. भारताने पाकिस्तानचे फायटर जेट्स पाडले आहेत, परंतु त्यांना भारताच्या हद्दीत येवून न दिल्यामुळे त्यांचे अवशेष उपलब्ध नसल्याचं देखील एअर मार्शल ए.के. भारती यांनी स्पष्ट केलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube