भीषण अपघात! ट्रक आणि ट्रेलरच्या धडकेत 13 जणांचा मृत्यू, रायपूरमध्ये रस्त्यावर मृतदेहांचा खच अन् रक्ताचा सडा

भीषण अपघात! ट्रक आणि ट्रेलरच्या धडकेत 13 जणांचा मृत्यू, रायपूरमध्ये रस्त्यावर मृतदेहांचा खच अन् रक्ताचा सडा

Raipur Road Accident More Than 10 People Death : छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये आज पहाटे भीषण रस्ता (Raipur Road Accident) अपघात झाला. रायपूर-बालोदाबाजार महामार्गावर खरोराजवळ ट्रक आणि ट्रेलरमध्ये जोरदार टक्कर (Accident) झाली. या भीषण रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 12 जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर जखमींना खारोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. गंभीर जखमींना उपचारासाठी रायपूर मेडिकल कॉलेजमध्ये (Chhattisgarh) रेफर करण्यात आले आहे.

या अपघातात एकाच कुटुंबातील 13 जणांचा मृत्यू झाला आहे. छठी कार्यक्रमात सहभागी होऊन हे कुटुंब परतत (Road Accident) असल्याचे सांगण्यात येत आहे. याच दरम्यान हा रस्ता अपघात घडला. रायपूर-बालोदाबाजार रोडवरील सारागावजवळ त्यांचे वाहन एका हायस्पीड ट्रेलरला धडकले. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे, यात महिला आणि मुलांचा समावेश आहे.

Rashi Bhavishya : धनलाभ, कामात यश… तुमचे आजचे राशिभविष्य काय सांगते ? वाचा एका क्लिकवर…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चतौड येथील सुमारे 50 लोक स्वराज माझदा गाडीने खरोरा येथील बाणा बनारसी येथे गेले होते. तेथून परत येत असताना त्यांच्या गाडीचा ट्रेलर गाडीशी अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, परंतु मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. अपघाताची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले.

ऑपरेशन सिंदूर : भारताला काय मिळालं, पाकिस्तानचं किती नुकसान? 12 पॉइंट्समध्ये घ्या जाणून..

स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना उपचारासाठी सामुदायिक आरोग्य केंद्र खरोरा आणि वैद्यकीय महाविद्यालय रायपूर येथे दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच रायपूर एसपींसह अनेक पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी खूपच भयंकर परिस्थिती आहे. पोलिसांचे पथक मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहे.

रायपूरचे एसपी लाल उम्मेद सिंह म्हणाले, ‘चटौड गावातील काही लोक छठी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बना बनारसी येथे गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते परतत होते. दरम्यान, रायपूर-बालोदा बाजार रोडजवळ एक अपघात झाला. एकूण 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर 12 जण जखमी झाले आहेत. सर्वांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube