Video : …तर काय उत्तर मिळेल हे पाकिस्तानला माहीत आहे; भारतीय नौदलाने ‘हवाच’ काढली

Video : …तर काय उत्तर मिळेल हे पाकिस्तानला माहीत आहे; भारतीय नौदलाने ‘हवाच’ काढली

Operation Sindoor : पहलगाम हल्ल्याला भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं. भारत कोणत्याही प्रकारचा दहशतवाद सहन करणार नाही, हा संदेश भारताने जगाला दिला. (Sindoor) जर कोणी भारतात अशांती निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर भारत त्यांच्या घरात घुसून मारेल, अशा स्वरुपाचा इशारा होता. इशारा भारताने दिला आहे. पाकिस्तानने एक जरी चुकीचे पाऊल उचलले, तर त्याला काय उत्तर मिळेल हे त्याला माहीत आहे, असा सज्जड दम भारतीय नौदलाने भरला.

 पाकची जहाजे दबा धरुन बसली

भारतीय नौदलाने आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पाकिस्तानी नौदल आणि हवाई दल बचावात्मक भूमिकेत आले. भीतीने पाकिस्तानी जहाजे बंदरांमध्ये दबा धरुन बसली किंवा किनाऱ्याजवळ फिरत राहिली. भारतीय नौदलाने त्यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली. डीजीएनओ स्पष्टपणे म्हणाले, “पाकिस्तानची प्रत्येक चाल आमच्या रडारवर आहे. आमची नौसेना कोणत्याही शत्रुत्वापूर्ण कारवाईला निर्णायक उत्तर देण्यासाठी तयार आहे.

नौदल युद्धासाठी सज्ज

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय नौदलाने त्वरित कारवाई केली. केवळ 96 तासांमध्ये नौदलाने युद्धनौका, पाणबुड्या आणि विमानांसह आपले सैन्य अरबी समुद्रात तैनात केले. कराचीसारख्या पाकिस्तानी ठिकाणांना नष्ट करण्यासाठी रणनीती आखण्यात आली. शस्त्रास्त्रांचा वापर करून युद्धाची तयारी पूर्ण केली. भारतीय नौदलाच्या या ताकदीमुळे पाकिस्तान अक्षरशः गुडघ्यावर आला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube