लाडकी बहीण योजना, तब्बल 92 लाख महिला अपात्र; धक्कादायक आकडेवारी समोर

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारची लोकप्रिय योजना असणारी लाडकी बहीण योजनेतून सरकारने तब्बल 92 लाडक्या बहिणींना अपात्र ठरवले

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारची लोकप्रिय योजना असणारी लाडकी बहीण योजनेतून सरकारने तब्बल 92 लाडक्या बहिणींना अपात्र ठरवले असल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, संपूर्ण पडताळणी आणि ई-केवायसीनंतर 92 लाख महिलांना अपात्र ठरवले आहे. या योजनेत आता लाभार्थी महिलांची संख्या 1 कोटी, 65 लाख, 66 हजार, 164 वर आली आहे. द यंग व्हिसलब्लोअर्स फाऊंडेशन चे कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी माहिती अधिकारांतर्गत दाखल केलेल्या अर्जावर राज्य सरकारकडून ही माहिती देण्यात आली आहे.

जितेंद्र घाडगे (Jitendra Ghadge) यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेत ई केवायसी (E-kyc) प्रक्रियेमुळे लाखो गरजू महिला या योजनेतून बाहेर झाले आहे तर या योजनेसाठी हजारो अपात्र शासकीय कर्मचारी महिलांकडून पैशांची वसुली करण्यासाठी सरकारकडून अधिकृत यंत्रणाच तयार करण्यात आलेली नाही. तर दुसरीकडे या योजनेत आता 1.65 कोटी लाभार्थी महिला राहिल्याने राज्य सरकारवर दरमहा आर्थिक भार आता 2, 484.92 कोटी रुपये इतका असणार आहे तर राज्य सरकार या योजनेत वर्षाला 29, 819,10 कोटी रुपये खर्च करणार आहे.

माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, 4.42 लाख स्वयंघोषित शासकीय कर्मचारी आणि 8 हजार सत्यपित शासकीय कर्मचारी अशा एकूण 4.5 लाखांहून अधिक अर्जदारांनी बेकायदेशीरपणे निधी लाटला असून ही रक्कम दरमहा अंदाजे 600 ते 800 कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे मात्र ही रक्कम वसुलीसाठी आतापर्यंत राज्य सरकारकडून कोणतेही कारवाई करण्यात आलेली नाही.

1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर; राज्य सरकारची मोठी घोषणा

तर दुसरीकडे या योजनेतून नियमबाह्यरीत्या पैसे लाटणाऱ्या पुरुषांविरोधात कारवाई करण्यात येणार असून त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार असा इशारा राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांनी दिला आहे.

Exit mobile version