Ladki Bahin Yojana : लोकसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारकडून (Mahayuti Government) लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु करण्यात आली होती. ज्याचा मोठा फायदा राज्यातील कोट्यवधी महिलांना झाला आहे. या योजनेचा लाभ घेत अनेक महिलांनी स्वतःचा व्यवसाय देखील सुरु केला आहे. तर आता आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार, मुंबईतील या योजनेचा लाभ घेणाऱ्या माहिलांना 1 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे तेपण शून्य टक्के व्याजदाराने. याबाबात मुंबई बँकेकडून (Mumbai Bank) माहिती देण्यात आली आहे.
याबाबत माहिती देताना मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी सांगितले की, आता लाडक्या बहिणींना 9 टक्के दराने मिळणारा कर्ज शून्य टक्के व्याजदराने देण्यात येणार आहे. सरकारच्या 4 महामडंळातील विविध योजनांमधून ही सवलत देण्यात येणार असल्याची माहिती मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लाडक्या बहिणींच्या उद्योग-व्यवसायासाठी आणलेल्या कर्ज धोरणास राज्य सरकारच्या व्याज परतावा योजनेची सांगड घालून शून्य टक्के व्याजदरात कर्ज देऊन महिलांना उद्योग व्यवसायात स्वावलंबी करण्याचा निर्णय आज मा.मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis जी यांनी… pic.twitter.com/9xrD94n8NU
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) June 19, 2025
पर्यटन महामंडळाची आई योजना ज्यामध्ये महिलेला 12 टक्क्यांपर्यंत व्याजाचा परतावा दिला जातो तसेच अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, भटक्या विमुक्तांसाठी महामंडळ आणि ओबीसी महामंडळांच्या योजनांमधून व्याजाचा परतावा महिलांना दिला जातो. त्यामुळे आम्ही ज्या महिलांना कर्ज पुरवठा करत आहोत, त्या लाभार्थि महिला या योजनेत बसत असतील तर या महिलांना शून्य टक्के व्याजदरात कर्ज उपलब्ध करुन देणार असल्याची देखील माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली.
आळंदीत कत्तलखाना होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट
या योजनेत कर्जासाठी मुंबई बँकेकडे अर्ज केल्यानंतर महिलेला 1 लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळेल, त्यासाठी व्यवसायाची तपासणी केली जाईल. आम्ही व्याजाचा परतावा महामंडळाकडून मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुंबईतील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामध्ये 12 ते 13 लाख लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी आहेत. तर 1 लाखांच्या आसपास आमच्या बँकेकडे सभासद आहेत अशी माहिती देखील प्रवीण दरेकर यांनी दिली.