छत्रपती संभाजीनगरमध्ये गायरानधारकांचा जनआक्रोश मोर्चा; सरकारकडे काय केल्या मागण्या?

मोर्चानंतर शिष्टमंडळाने प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले. गेल्या ५० वर्षांपासून गायरानधारक जमीन कसत असून त्यावर त्यांच्या

Chhatrapati Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगरमध्ये गायरानधारकांचा जनआक्रोश मोर्चा; सरकारकडे काय केल्या मागण्या?

Chhatrapati Sambhajinagar : भूमिहीन गायरान हक्क संघर्ष समितीच्या वतीने गायरानधारकांच्या विविध प्रश्नांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये थाळीनाद करत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. (Chhatrapati Sambhajinagar) क्रांती चौकातून निघालेला मोर्चा पैठणगेट, गुलमंडी, सिटी चौक, किलेअर्क, अण्णा भाऊ साठे चौक असा होत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यांना निवेदन दिल.

मोर्चाचे नेतृत्व भूमिहीन गायरान हक्क संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष पंडित नवगिरे, प्रदेशाध्यक्ष सोमिनाथ महापुरे, मराठवाडा प्रदेश अध्यक्ष मनेष आव्हाड यांनी केलं. मोर्चात सहभागी झालेल्या हजारो भूमिहीन आणि गायरानधारकांनी थाळीनाद आणि जोरदार घोषणाबाजी करत आपल्या प्रश्नांकडं लक्ष वेधून घेतलं.

राजकारणाचा खेळ; शिरसाटांना उमगलाच नाही? चूक केली चक्रव्यूहात अडकले अन्..

मोर्चानंतर शिष्टमंडळाने प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले. गेल्या ५० वर्षांपासून गायरानधारक जमीन कसत असून त्यावर त्यांच्या कुटुंबाचा उदारनिर्वाह करत आहेत. मात्र, आजपर्यंत ही जमीन कसणाऱ्यांच्या नावावर केलेली नाही. सातबाऱ्याला कसणाऱ्याचे नाव लावण्यात आले नाही. ते त्वरित लावण्यात यावे, सौरऊर्जा प्रकल्पाच्या नावावर गायरान जमीन हडपण्याचे काम सुरू आहे.

ते त्वरित बंद करण्यात यावे, पिकांची नासधूस करणाऱ्या गावगुंडांवर कारवाई करावी यासह इतर मागण्यांसाठी करण्यात आल्या. पात्र गायरानधारकांच्या नावावर तत्काळ जमीन करण्याची कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन अडकुणे यांनी शिष्टमंडळाला दिले.

या मोर्चात गायरानधारकांसह भूमिहीन गायरान हक्क संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष रोहित सोनवणे, जिल्हा संघटक नितीन नवगिरे, महिला जिल्हाध्यक्ष संगीता अहिरे, राजू दाभाडे, मोहन आल्हाद, पदमाकर खोडे, जयराम गायकवाड, प्रदीप गायकवाड, सागर गायकवाड, महिला आघाडीच्या संगीता ठोंबरे, ध्रुपताबाई पवार, शिल्पा चौथमल, मीरा जाधव आदींचा सहभाग होता.

Exit mobile version