Suresh Wadkar : ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

Suresh Wadkar : राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांना जाहीर झाला आहे. संगीत आणि गायन क्षेत्रातील वाडकर यांच्या योगदानाची दखल घेण्यात येऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. सांस्कृतिक […]

Suresh Wadkar : ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

Suresh Wadkar

Suresh Wadkar : राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांना जाहीर झाला आहे. संगीत आणि गायन क्षेत्रातील वाडकर यांच्या योगदानाची दखल घेण्यात येऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्काराच्या रकमेत दुप्पट वाढ करण्यात आली आहे. तसेच राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची रक्कम तिप्पट करण्यात आली आहे.

Maharashtra Politics: पक्षांतरबंदी कायद्यात सदस्यांच्या अपात्रतेबाबत काय तरतूद ? पाहा व्हिडिओ

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव 2022 पुरस्कारासाठी पंडित उल्हास कशाळकर यांचे नाव घोषित झाले आहे. तर 2023 च्या पुरस्कारासाठी पंडित शशिकांत श्रीधर मुळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार 2022 सुहासिनी देशपांडे यांना जाहीर झाला आहे. 2023 च्या पुरस्कारासाठी अशोक समेळ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार 2022 साठी नयना आपटे यांचे तर 2023 च्या पुरस्कारासाठी पंडित मकरंद कुंडले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. राज्याचे सांस्कृतिक क्षेत्र संपन्न व्हावे तसेच यासाठी तत्पर आहोत, अशी प्रतिक्रिया सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

Maratha Reservation : ..तर मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर.. अशोक चव्हाणांनी सांगितला तोडगा

Exit mobile version