सुनेत्रावहिनींचे व्हिडिओ व्हायरल केल्यास कायदेशीर कारवाई करू; रूपाली ठोंबरेंचा इशारा

Rupali Thombre warns यांनी सुनेत्रा पवारांच्या खांद्यावर हात टाकलेले व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यावर कारवाईचा इशारा दिला आहे.

Rupali Thombre Warns

Rupali Thombre Warns

Legal action will be taken if DCM Sunetra Pawar videos go viral; Rupali Thombre warns : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यानंतर त्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा देखील झाल्या आहेत. मात्र यावेळी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा वरचष्मा दिसला. यावरून त्यांच्यावर टीका होत आहे. तसेच त्यावेळी सुनेत्रा पवारांच्या खांद्यावर हात टाकलेले नेते, याचे व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. त्यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या आणि नगरसेविका रूपाली ठोंबरे पाटील यांनी कारवाईचा इशारा दिला आहे.

नेमकं काय म्हणाल्या रूपाली ठोंबरे?

सुनेत्रा अजितदादा वहिनी यांच्याबद्दल जे व्हिडिओ व्हायरल करत आहात ते अत्यंत चुकीचे आहे. सुनेत्रावहिनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्री झालेले आहे.आता त्या राष्ट्रीय अध्यक्षा झाल्या आहेत.या आधी पासून त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माऊली म्हणून कुटुंबातील स्नेहाने मोठ्या वहिनी म्हणून पक्ष घर, सांभाळतच होत्या. त्याच्यामुळे सातत्याने जे आपण आज व्हिडिओ जाणीवपूर्वक व्हायरल करत आहात त्यात

पाकिस्तानची अफगान विरूद्ध युद्धाची घोषणा! पाकच्या एअर स्ट्राईकला तालिबानचं आक्रमक उत्तर

धनंजय भाऊ मुंडे यांनी त्यांना हात दिला प्रफुल पटेल यांनी त्यांना पुढे जाण्यासाठी हात दिसत असले तरी तो आईसमान वहिनी माऊली,भगिनी म्हणून दिलेला आहे. वास्तविक पाहता धनंजय भाऊ मुंढे हे श्रीमती सुनेत्रा वहिनीने मुलासारखे सांभाळले आहे. धनंजय भाऊ मुंडेंना सुनेत्रावहिनी आईसमान आहे त्या नात्याने कुटुंबातील स्नेह नात्याच्या मुलाच्या हक्काने त्यांनी तो हात दिला होता.

उपमुख्यमंत्री सनेत्रा पवार यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, काय होत प्रकरण?

दुसरा विषय प्रफुल भाई पटेल यांचा तर प्रफुल भाई पटेल हे त्यांचे मोठे दीर भावासमान आहेत. त्यांनी दादांसोबत 25, 30 वर्ष काम करत असताना त्यांना सुद्धा कुटुंबातील स्नेह या भावनेनेच वहिनी बहिणीसारखी म्हणून त्यांच्याकडून तो हात पुढे आला होता.आपल्या अजितदादांच्या दुःखद निधनानंतर झालेली अवस्था ही अत्यंत भावनिक,मानसिक वेदनादायक होती आजही आहे.पण आता सुनेत्रावहिनी अजितदादा पवार उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत त्यामुळे सर्व शिष्टाचार,प्रोटोकॉल,नियम नक्कीच पाळले जातील.विनाकारण कृपया जाणीवपूर्वक विडिओ वायरल करू नये.

किसान सभा अन् ट्रेड युनियनच्या संयुक्त मोर्चाला मोठं यश, पालकमंत्री विखेंनी मागण्या केल्या मान्य

राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्रीचे सोशलावर विनापरवानगी घेता चुकीचे विडिओ वायरल केल्यास कायदेशीर कारवाई आम्हाला करावी लागेल.त्यामुळे कळकळीची नम्र विनंती असेल कृपया असे विडिओ तयार करून वायरल करू नये. असं म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्या आणि नगरसेविका रूपाली ठोंबरे पाटील यांनी कारवाईचा इशारा दिला आहे.

 

Exit mobile version