…तर भाजप अहिल्यानगरची जागा स्वबळावर जिंकेल; विधानपरिषेसाठी ‘या’ नावांची चर्चा 

Legislative Council Election : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 विधानपरिषद जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून अहिल्यानगरच्या

Legislative Council Election

Legislative Council Election

Legislative Council Election : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 विधानपरिषद जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून अहिल्यानगर च्या जागेवर कोण दावा करणार याकडे लक्ष लागलेले आहे यातच राष्ट्रवादीची असलेली विधान परिषदेची ही जागा महायुतीमध्ये बदलल्या राजकीय समीकरणामुळे व तुल्यबळ विचार करता नगरची जागा भाजपकडे जाऊ शकते अशी चर्चा आहे. दरम्यान याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही मात्र या चर्चेमुळे राष्ट्रवादीतील इच्छुकांमध्ये नाराजीचा सूर आहे

विधान परिषदेच्या (Legislative Council Election) अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या एका जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आता सुरुवात झालेली असून पहिल्याच दिवशी निवडणूक कार्यालयात नव इच्छुकांनी 16 उमेदवारी अर्ज नेले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील महापालिका नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे एकूण 461 सदस्य या निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

 तर भाजप स्वबळावर निवडणूक जिंकेल

स्वर्गीय आमदार अरुण जगताप यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ जानेवारी 2022 मध्ये पूर्ण झाला होता त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्याने ही जागा रिक्त होती. अखेर या निवडणुकीचे बिगुल वाजले गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांच्या गटाच्या ताब्यात असलेली जागा आता भाजप स्वतःकडे खेचून घेण्याच्या तयारीत आहे.

जिल्ह्यात 11 नगरपरिषदा चार नगरपंचायती आणि छावणी परिषद मिळून एकूण 461 मतदार आहेत. यामध्ये भाजपचे सर्वाधिक 199 नगरसेवक मतदार आहेत व भाजपचाच उमेदवार निवडून आणण्यासाठी गरज पडल्यास आमदार सत्यजित तांबे यांच्या संगमनेर सेवा समितीचे 33 आणि माजी आमदार प्राजक्ता तनपुरे यांच्या राहुरीतील जनविकास आघाडीचे 17 नगरसेवकांचा पाठिंबा घेतला तर भाजप 249 जागा मिळवतो यामुळे भाजपचा उमेदवार स्वबळावरही सहज विधान परिषदेत गवसणी घालू शकतो.

रायगडच्या जागेसाठी राष्ट्रवादी नगरची जागा सोडणार…

महायुतीमध्ये जागावाटपाचा फॉर्मुला निश्चित झाल्याचे समजते आहे. महायुतीत भाजप 12 शिवसेना चार आणि राष्ट्रवादीच्या वाटेला रायगडची एकमेव जागा जाण्याची दाट शक्यता आहे असे झाले तर अहिल्यानगरची हक्काची भाजप स्वतःकडे ठेवू शकते. महायुतीच्या नव्या फॉर्मुल्यानुसार राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे त्यांचा बालेकिल्ला पक्षाकडे ठेवण्यासाठी प्रयत्न करतील त्यामुळे या बदल्यात अहिल्यानगरचा दावा सोडणे राष्ट्रवादीला भाग पाडू शकते.

 एका जागेसाठी इच्छुकांची भाऊ गर्दी

विधान परिषदेच्या या एका जागेसाठी मोठ्या संख्येने इच्छुकांची नावे समोर येत आहे. राष्ट्रवादीच्या या जागेवरती आमदार संग्राम जगताप यांचे बंधू माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांचेही नाव चर्चेत आहे. तर माजी आमदार राहिलेले चंद्रशेखर घुले हे देखील तयारीत आहे.

दुसरीकडे राहुरीच्या पोटनिवडणुकीत माघार घेतलेले प्राजक्त तनपुरे यांचेही नाव समोर येऊ शकते अशी चर्चा तनपुरे समर्थकांमध्ये आहे तर राष्ट्रवादीचे श्रीगोंदाचे माजी आमदार राहिलेले राहुल जगताप यांनी देखील काही दिवसांपूर्वी राम शिंदे यांची भेट घेतल्याने जगताप देखील या स्पर्धेत आहे.

पुण्यात छोट्या व्यावसायिकांची दुकाने बंद करुन पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहतंय ?-

दरम्यान विधान परिषदेच्या या एका जागेसाठी अर्ज दाखल करण्यास 25 मे पासून सुरुवात झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एक जून पर्यंत मुदत देण्यात आली आहे. नगरमध्ये राष्ट्रवादी जागेवर दवाखान्यात की भाजप ही जागा आपल्याकडे खेचणार याकडे नगर जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. तसेच निष्ठावातांना संधी मिळणार की पुन्हा त्यागाला सामोरे जावे लागणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version