Maharashtra Budget 2023 : शिंदे- फडणवीस सरकाराच (Shinde Fadnavis Govt) पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करत आहेत. सहा महिन्यांपूर्वी राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार सत्तेत आलं. सत्तेत आल्यानंतर अनेक मोठे निर्णय सरकारकडून घेण्यात आले. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला जात असून त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणत्या घोषणा करणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
https://www.youtube.com/watch?v=N_-NCOncia8
अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे विधानसभेत सादर करत आहेत. आता आता मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना आता नव्या स्वरूपात असल्याची घोषणा फडणवीसांनी यावेळी केली आहे. पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना लाभ मिळणार आहे. मुलीच्या जन्मानंतर मुलीला 5 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मुलींना आता पहिलीत 4 हजार रुपये, तर सहावीमध्ये 6 हजार रुपये आणि अकरावीमध्ये 8 हजार रुपये, असे मुलगी 18 वर्षांची होत पर्यंत तिला 75 हजार रुपये ‘लेक लाडकी’ योजनेमार्फत मिळणार आहेत.
Maharashtra Budget 2023 : अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी; मानधनात भरीव वाढ
तसेच, मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये, अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये इतके वाढवण्यात येणार आहे. अंगणवाडी, याशिवाय मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरली जाणार असून, यामुळे रोजगाराचा प्रश्न मार्गी लागणार असून, अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली राबविली जाणार असल्याचे यावेळी फडणवीसांनी सांगितले.