List of BJP’s star campaigners for municipal councils and panchayats announced : राज्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. त्यामध्ये आता प्रत्यक्ष निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर भाजपची जय्यत तयारी सुरू झाली आहे. दरम्यान राज्यामध्ये काही अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी मात्र सर्वच पक्ष स्वबळावर निवडणुका लढणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. त्यात आता भाजपने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका 2025 साठी भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करणाऱ्या भाजप नेत्यांची नावं म्हणजे स्टार प्रचारकांची नावं जाहीर केले आहेत. कोणते आहेत हे भाजपचे स्टार प्रचारक पाहूयात…
भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करणाऱ्या भाजप नेत्यांची नावे…
देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण, नितीन गडकरी, शिवप्रकाश जी, चंद्रशेकर बावनकुळे, विनोद तावडे, अशोक चव्हाण, पीयूष गोयल, नारायण राणे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत (दादा) पाटील, रावसाहेब दानवे पाटील, ॲड. आशिष शेलार, राधाकृष्ण विखे पाटील, मुरलीधर मोहोळ, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, गणेश नाईक, जयकुमार रावल, छ.शिवेंद्रराजे भोसले, नितेश राणे, जयकुमार गोरे, मेघना बोर्डीकर, अमर साबळे, अतुल सावे, अशोक उईके, चित्रा वाघ, रक्षा खडसे, प्रविण दरेकर, भागवत कराड, गोपीचंद पडळकर, डॉ.संजय कुटे, अमित साटम, धनंजय महाडिक, ॲड माधवी नाईक, रणधीर सावरकर, अशोक नेते, मंगेश चव्हाण, प्रसाद लाड, इद्रिस मुलतानी.
IND vs SA : आधी टी नंतर लंच ब्रेक, गुवाहाटी कसोटीच्या वेळेत बदल; BCCI चा मोठा निर्णय
या नावांची घोषणा करणारं पत्रक भाजपचे प्रदेशाध्य रविंद्र चव्हाण यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आता भाजपचे हे सर्व आमदार, मंत्री असलेले दिग्गज नेते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका 2025 साठी भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसणार आहे. त्यांच्या विविध सभांचं आयोजन केलं जाईल.
