सुप्रीम कोर्टात या आठवड्यातील सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी होणार आहे. काल ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. आता शिंदे गटाकडून युक्तिवाद सुरु आहे. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी, देवदत्त कामत यांनी युक्तीवाद केला होता.
काल दुपारनंतर शिंदे गटाकडून युक्तिवाद सुरु आहे. शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील हरिश साळवे, अॅड. नीरज किशन कौल, अॅड. मनिंदर सिंग आणि महेश जेठमलानी युक्तिवाद करणार आहेत. काल शिंदे यांचे वकील नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद सुरु केला आहे.
Maharashtra Budget Session : दरम्यान राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झालं आहे. शिंदे-ठाकरे गटातील वादाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने उभे ठाकले आहेत. सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधक सज्ज असताना विरोधकांचा सामना करण्यासाठी सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनीही तयारी केली आहे.
