Download App

“तुमच्यासाठी दारचं काय खिडक्याही उघड्या!” तिसऱ्या आघाडीसाठी वंचितला जुन्या मित्राचा खास प्रस्ताव

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत (Lok Sabha Elections 2024) सहभागी होण्याचे निश्चित नसताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी (Prakash Ambedkar) आठ उमेदवारांची यादी जाहीर केली. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी (Manoj jarange) सामाजिक युती असल्याचेही जाहीर केले. या घडामोडींची राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू असतानाच वंचितला पुन्हा जुन्या मित्रानं साद घातली आहे. हा जुना मित्र म्हणजे खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा एमआयएम पक्ष. या पक्षाचे छत्रपती संभाजीनगर येथील खासदार इम्तियाज जलील यांनी वंचित बहुजन आघाडीला पुन्हा एकत्र येण्याचा प्रस्ताव दिला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात भाजपला मिळाले ‘बॉस’ : UP मधील बाहुबली नेते नवे इनचार्ज  

 

follow us