Download App

तुझा आजा-पणजा इंग्रजांचे बूट चाटत असेल…; स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत जावेद अख्तर भडकले

जावेद अख्तर यांनी नुकतेच त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पण, पोस्टवर पाकिस्तानशी जोडले.

  • Written By: Last Updated:

Lyricist Javed Akhtar : आज 15 ऑगस्ट, स्वतंत्र्यदिन मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला. गीतकार जावेद अख्तर यांनी त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली. (Javed) त्यामध्ये त्यांनी देशाच्या शहीदांना स्मरून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पण, पोस्टवर एका यूजरने कमेंट करत जावेद अख्तर यांना पाकिस्तानशी जोडले. ते पाहून जावेद अख्तर संपाले आणि त्यांनी त्या यूजर्सला चांगलंच सुनावलं.

जावेद अख्तर हे त्या सेलिब्रिटींपैकी एक आहेत, जे लोकांसमोर आपलं मत निर्भयपणे मांडतात आणि चुकीच्या गोष्टींना तितक्याच ताकदीने उत्तर देतात. नुकतेच याचे एक उदाहरण त्यांच्या एक्स (ट्विटर) पोस्टमध्ये दिसल. 15 ऑगस्टच्या खास प्रसंगी त्यांनी एक्सवर पोस्ट करत लिहिले, माझ्या सर्व भारतीय बहिणी आणि भावांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण हे विसरता कामा नये की हे स्वातंत्र्य आपल्याला थाळीत वाढून मिळाले नाही.

हाथी घोडा पालकी, बर्थडे कन्हैया लाल की’ स्टार प्लसवरील जन्माष्टमी विशेष कार्यक्रमाबद्दल समृद्धी शुक्लाने व्यक्त केल्या भावना

आज आपण त्या लोकांना आदरांजली वाहिली पाहिजे आणि त्यांना सलाम केला पाहिजे जे आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी तुरुंगात गेले, फासावर चढले. चला, आपण हे सुनिश्चित करूया की हा अनमोल खजिना आपण कधीही गमावणार नाही. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. अनेक युजर्सनी कमेंट सेक्शनमध्ये त्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, एका युजरने कमेंट करत लिहिले की तुमचा स्वातंत्र्यदिवस तर 14 ऑगस्टला आहे. खरे तर 14 ऑगस्टला पाकिस्तानात स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो.

या युजरच्या या उलट्या कमेंटला उत्तर देताना जावेद अख्तर यांनी लिहिले, “बेटा, जेव्हा तुझा आजा-पणजा इंग्रजांचे बूट चाटत होते, तेव्हा माझे पूर्वज देशाच्या स्वातंत्र्यासाठी काळ्या पाण्यात मरत होते. तुझ्या लायकीत राहा.” यानंतर त्या युजरने आणखी काही प्रत्युत्तर दिले, पण जावेद अख्तर यांच्या समर्थनार्थ अनेकांनी त्या युजरला उत्तर दिले. एका युजरने लिहिले की, तुमच्यावर खोटी माहिती पसरवल्याच्या आणि निकृष्ट भारतीय असल्याच्या आरोपाखाली तक्रार केली पाहिजे. तुम्ही इथून निघून जावे, आम्हाला तुम्ही भारतात नको.

follow us