स्वातंत्र्यादिनी जालना पोलिसांचा माजोरडेपणा महाराष्ट्रासमोर; आंदोलनकर्त्याच्या कंबरात घातली लाथ

Jalna Police : जालना येथे खळबळजनक घटना घडली आहे. (Police) जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या एका व्यक्तीला पोलीस अधिकाऱ्याने आंदोलनकर्त्याच्या कमरेत लाथ घातली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नागरिकांनी यावर संताप व्यक्त केला आहे.
जालना येथील एका व्यक्तीच्या पत्नीने परस्पर दुसरं लग्न केलं. या व्यक्तीने यासंदर्भात पोलिसांशी संपर्क साधला. पण पोलिसांकडून मदत झाली नसल्याचा आरोप व्यक्तीने केला. पत्नीने परस्पर लग्न केल्याच्या वैफल्यातून आणि पोलिसांकडून कोणतीही मदत न मिळाल्याने त्याने स्वातंत्र्यदिनी अंगावर रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळा, 11 कर्मचारी निलंबित; जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची कारवाई
पत्नीने परस्पर दुसरे लग्न केल्याने वैफल्यग्रस्त व्यक्तीने अंगावर रॉकेल घेऊन आत्महदनाचा प्रयत्न केला. या व्यक्तीला कमरेत पोलीस अधिकाऱ्याकडून लाथ मारतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. ध्वजारोहण कार्यक्रमाच्या अगोदर घडलेल्या या प्रकऱणानंतर पोलिसांनी गोपाळ चौधरी नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
लाथ मारतानाच्या व्हिडीओवर पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. आत्महदन करण्यासाठी हा व्यक्ती स्वत:च्या अंगावर रॉकेल टाकत होता. तेव्हा त्याने पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगवारही रॉकेल टाकण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्या विरोधामध्ये बळाचा वापर केल्याचे स्पष्टीकरण उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिलं आहे.