गोपीनाथ मुंडे असते तर मी आज… रासपचे नेते महादेव जानकरांचं मोठं विधान

आज जर गोपीनाथ मुंडे असते तर मी केंद्रात मंत्री असतो, असं विधान राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी केलं आहे. दरम्यान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. Horoscope Today 1 June 2023: आज ‘मिथुन’ राशींना मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची […]

"लोकसभा तर ट्रेलर खरा पिक्चर विधानसभेत"; पवारांची साथ मिळताच जानकरांनी भाजपला ठणकावलं

"लोकसभा तर ट्रेलर खरा पिक्चर विधानसभेत"; पवारांची साथ मिळताच जानकरांनी भाजपला ठणकावलं

आज जर गोपीनाथ मुंडे असते तर मी केंद्रात मंत्री असतो, असं विधान राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी केलं आहे. दरम्यान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.

Horoscope Today 1 June 2023: आज ‘मिथुन’ राशींना मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची शक्यता

ते म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्ष सर्वच समाजातील तरुणांना सोबत घेऊन जाणार आहे. आम्ही कोणत्या धर्माच्याविरोधात नसून देशातल्या चार राज्यांमध्ये पक्षाचं काम सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच मला मुंबईत राहायचं नसून माझं लक्ष्य दिल्ली आहे. दिल्लीत जो राज्य करतो तो सर्वच राज्यांमध्ये राज्य करतो. आता फक्त विकास नाहीतर इथल्या जमातींना मला शासनकर्ती जमात घडवायचं असल्याचं स्वप्न असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

‘सुविधा द्या, नाहीतर तेलंगणात जाऊ’; विदर्भातील गावांचा सरकारला इशारा

महाराष्ट्रात मराठा समाजापेक्षा धनगर आणि बंजारा समाजाची परिस्थिती दयनीय आहे. त्यामुळे आम्हाला आता आरक्षण मागणारा नाहीतर आरक्षण देणारा समाज घडवायचा उद्देश असल्याचंही त्यांनी म्हटलंय. आम्हााला गोपीनाथ मुंडे यांनी राज्यात उभारी दिली. माझ्या अनेक कार्यक्रमांना मुंडे आले आहेत. मात्र, त्यांचं आता निधन झालं. गोपीनाथ मुंडे असते आज मी केंद्रात मंत्री असतो, असंही त्यांनी म्हटलंय.

Naveet Rana : हनुमान चालीसा म्हटल्यानं कोर्टात यावं लागतयं ही ठाकरेंचीच देण…

मात्र, आता आम्हाला गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न साकार करायचे आहे,. त्यासाठी आगामी काळात देशातल्या विविध राज्यांमध्ये आम्ही निवडणूका लढवणार असल्याचंही त्यांनी यावेळी जाहीर केलंय, तसेच कोणी सोबत नाही घेतलं तर आम्हाला अनेकांच आमंत्रण असल्याचंही त्यांनी भर कार्यक्रमात मिश्किलपणे म्हटलं आहे.

दरम्यान, इतिहासकारांनी अहिल्याबाई होळकरांवर अन्याय केला असून अहिल्यांबाईंनी नूसती मंदिर बांधलं असल्याचं सांगतिलं जातं. पण अहिल्याबाईंनी मंदिर, गुरुद्वारा, चर्चही बांधेल आहेत हा इतिहास इतिहासकारांनी दाबला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

Exit mobile version