Download App

…अन्यथा माझी डेडबॉडी परळीला येईल; महादेव मुंडे यांच्या पत्नीचं टोकाच पाऊल..आजपासून उपोषण

महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाला जवळपास दीड वर्ष होत असताना देखील यातील आरोपी अटकेत नाहीत. हे प्रकरण आमदार सुरेश धस

  • Written By: Last Updated:

Mahadev Munde Murder Case : परळीमध्ये 20 ऑक्टोबर 2023 ला महादेव मुंडे यांची हत्या झाल्याचं समोर आलं होतं. या घटनेत FIR दाखल होण्यासाठी कित्येक महिने उलटून गेले. व्यावसायिक असलेल्या (Murder) महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी न्याय मागण्यासाठी आक्रमक झाले आहेत. आजपासून महादेव मुंडे यांचं सर्व कुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहे.

दमानियांचा दावा करूणा शर्मांचां पाठिंबा; धनंजय मुंडेंच्या मागे लागणार नवा ससेमिरा?

महादेव मुंडे प्रकरणात तपासाला गती मिळत नाही, मी आता मागे हटणार नाही, भले माझी डेडबॉडी परळीला येईल असं मृत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या. आजपासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी आमरण उपोषणला बसण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरात लवकर आरोपींना अटक करून न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. 21 ऑक्टोबर 2023 रोजी परळी तहसील कार्यालय परिसरात महादेव मुंडे यांची निर्घुण हत्या करण्यात आली होती.

महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाला जवळपास दीड वर्ष होत असताना देखील यातील आरोपी अटकेत नाहीत. हे प्रकरण भाजप आमदार सुरेश धस यांनी पुन्हा समोर आणलं. त्या नंतर या प्रकरणाची फाईल री ओपन झाली आहे. आज सर्व कुटुंब बीड ला आमरण उपोषण करण्यासाठी जात आहे. दरम्यान, काही दिवसांपू्र्वी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही महादेव मुंडे यांच्या कुटुंबाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी आपण या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

follow us