मला तुरूंगात फाईव्ह स्ट्रार हॉटेमधील जेवण पाठवलेलं; करूणा शर्मांमुळे धनंजय मुंडेंच्या मागे नवा ससेमिरा

  • Written By: Published:
मला तुरूंगात फाईव्ह स्ट्रार हॉटेमधील जेवण पाठवलेलं; करूणा शर्मांमुळे धनंजय मुंडेंच्या मागे नवा ससेमिरा

मुंबई : संतोष देशमुख्य हत्याप्रकरणानंतर चर्चेत आलेला वाल्मिक कराड तुरूंगातून व्हिसीद्वारे लोकांशी गप्पा मारत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केला आहे. यापूर्वीदेखील दमानिया यांनी कराडला जेलमध्ये व्हिआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता करूणा धनंजय शर्मा- मुंडे यांनी दमानियांच्या आरोपांना पाठिंबा देत धनंजय मुंडेंचे (Dhananjay Munde) नाव घेतले आहे. त्यामुळे येत्या काळात धनंजय मुंडे यांच्या मागे नवा ससेमिरा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Video : आता बोलायला सगळे मार्ग मोकळे झालेत; परब अन् चंद्रकांत पाटलांच्या संवादाने पुन्हा फुटली नवी पालवी

मला तुरूंगात फाईव्ह स्ट्रारमधून जेवण आलं होतं

दमानियांच्या आरोपांनंतर वातावरण तापलेले असतानाच करूणा मुंडे यांनी दामानियांनी केलेल्या दाव्यांवर मी ठामपणे शिक्कामोर्तब करत आहे. कारण मी ज्यावेळी 16 दिवस जेलमध्ये होते. त्यावेळी माझे पती माझ्यासोबतही अर्धा-अर्धा तास बोलत असल्याचे करूणा यांनी म्हटले आहे. त्यामुळे अंजली दमानियांनी वाल्मिक कराडला मिळणाऱ्या सोयींबद्दल जो दावा केला आहे, तो 100 टक्के बरोबर आहे.त्यांच्या आरोपांवर माझा विश्वास आहे, असं करूणा शर्मा म्हणाल्या.

रोहित वजन कमी कर, तू सर्वात अपयशी कर्णधार…, काँग्रेस नेत्या शमा मोहम्मदची वादग्रस्त पोस्ट व्हायरल

तेव्हा मी थेट दिला होता नकार

एवढेच नव्हे तर, मी सहा दिवस एका सफरचंदावर होते. त्यावेळी धनंजज मुंडे यांनी फोन करून सांगितले होते की, कांदा लसूण नसलेले फाईव्ह स्ट्रार हॉटेलचे जेवण पाठवले आहे ते तू खा असे सांगितले होते. पण ते पाठवलेले जेवण मी करणार नाही असे मी ठणकावून सांगितले. कारण मला खोट्या प्रकरणात अडकवून जेलमध्ये टाकल्याचे मी धनंजय मुंडेंना ऐकवल्याचेही करूणा शर्मा मुंडे यांनी सांगितले.

जितेंद्र आव्हाडांना अटक झाली का?, दोन्ही हातात बेड्या का घातल्या? नक्की काय घडलं?

धनंजय मुंडेंसारखे लोक मंत्रालयात नकोत

वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांची सावली असून, त्याच्याकडे हजारो कोटींची मालमत्ता असल्याचा दावाही करूणा यांनी केला आहे. धनंजय मुंडेंसारखे लोक मंत्रालयात नकोत, असे म्हणत त्यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत पुनरुच्चार केला आहे. यापूर्वीदेखील तुरूंगात काही आरोपींना व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जात असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. मात्र, आता करूणा मुंडे यांनीच त्या  जेलमध्ये असताना धनंजय मुंडेंनी फाईव्ह स्ट्रार हॉटलचे जेवव पाठवल्याचे आणि फोनवर अर्धा-अर्धा तास बोलत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे वाल्मिक कराडवरून राजीनाम्याची मागणी करणाऱ्या विरोधकांना शर्मा यांच्या या दाव्यानंतर आणखी एक आयतं कोलित मिळाले असून, यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube