धनंजय मुंडे अर्थसंकल्पाआधी मंत्रीपदाचा राजीनामा देणार?, पत्नी करुणा मुंडे यांनी थेट तारीख सांगितली

Karuna Munde Posts on Dhananjay Munde Resignation : संतोष देशमुख हत्या प्रकरणी महत्त्वाचा मोठा खुलासा झाला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, वाल्मीक कराड हा या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. खंडणीच्या वादातूनच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा उल्लेख या आरोपपत्रात आहे. (Munde) तसंच, या प्रकरणात खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही घटनांचा समावेश करण्यात आला आहे. अशातच करुणा मुंडे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्ट माध्यमातून सूचक वक्तव्य केलं आहे. 3 मार्च 2025 रोजी धनंजय मुंडेचा राजीनामा होणार आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची मागणी गेल्या काही दिवसात सातत्याने होत आहेत. विरोधकांसह महायुतीतील काही आमदार देखील धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यावरती ठाम आहेत. अशातच मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांच्या अडचणी सातत्याने वाढत आहेत, त्यांच्यावरती आरोप होत आहेत. त्यानंतर आथा पोलिसांच्या आरोपपत्रानंतर आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात येणार का? असा सवाल उपस्थित होत असतानाच करुणा मुंडे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्ट माध्यमातून सूचक वक्तव्य केलं आहे.
Video : देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार कराडच; आरोपपत्र दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री काय म्हणाले
उद्या म्हणजेच तीन मार्च रोजी धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार अशी फेसबुक पोस्ट करून मुंडे यांनी केली आहे. त्यांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. काल पोलिसांच्या आरोप पत्रात वाल्मीक कराड हा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांच्यावरील राजीनामाची मागणी आणि दबाव वाढत आहे. अशातच करुणा मुंडे यांची पोस्ट चर्चेत आली आहे. तीन मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही पोस्ट केली आहे का असा सुद्धा सवाल उपस्थित होत आहे.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्याची मागणी वाढत आहे. सत्ताधारी पक्ष असो, विरोधक असो किंवा सामाजिक संघटना असो यांच्याकडून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी वारंवार केली जात आहे. त्यानंतर आता स्वतः करुणा मुंडे यांनी केलेली पोस्ट यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तसंच, मुंडे यांनी राजीनामा लिहून ठेवला असल्याचाही दावा केला आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.