कालच देवगिरीवर बैठक, अर्धा तास पवार अन् फडणवीसांमध्ये खलबतं; मुंडेंच्या राजीनाम्याची इनसाईड स्टोरी समोर…

Dhananjay Munde Resignation Inside Story NCP Meeting : महायुती सरकारमध्ये (Devendra Fadanvis) पहिली विकेट अजित पवार (Ajit Pawar) गटाची पडली आहे. आज राज्याचे अन्न आणि पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. हा अजित पवार गटाला धक्का मानला जातोय. मुंडेंच्या राजीनाम्याची इनसाईड स्टोरी जाणून घेऊ या.
कालपासून राज्याचे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. दरम्यान कालच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येचे फोटो देखील समोर आले. त्यामुळे राज्यात मोठी संतापाची लाट आलीय. धनंजय मुंडे यांनी आज मंत्रिपदाचा राजीनामा दिला, परंतु कालच यासंदर्भात महायुतीच्या नेत्यांची देवगिरीवर बैठक झाल्याचं समोर येतेय.
धनंजय मुंडेंचं गलिच्छ स्टेटमेंट…100 लोक गायब, सीडीआर का काढले जात नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वारंवार धनंजय मुंडे आणि त्यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्या नावाची चर्चा होत होती. त्यामुळे महायुती सरकारवरील दबाव वाढत होता. मुंडे अन् कराड यांची असलेली जवळीक चर्चेचा विषय राजकीय वर्तुळात होता. नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करत विरोधक वारंवार मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत होते.
सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करत असताना आरोपींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीकेची मोठी झोड उठली होती. हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल अन् अजित पवार यांची अर्धा तास बैठक पार पडल्याचं समोर येतंय. या बैठकीत अजित पवारांनी धनंजय मुंडे यांची कानउघडनी देखील केली, अशी माहिती समोर येतेय.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना तारीख पे तारीख! उन्हाळ्यातही निवडणुका नाहीच
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजीनाम्यासंदर्भात कालच धनंजय मुंडे यांच्यासोबत बोलले असल्याची आता माहिती मिळतेय. सुरूवातीपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आग्रही होते, तर मुंडेंच राजीनामा द्यायला तयार नव्हते. त्यामुळं अजित पवार यांनी त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय घ्यावा, असं फडणवीसांनी म्हटलं होतं.