मी शेलारमामा सारखा माणूस, तुम्ही जवळ आल्यास फुकून फुकून उडवून टाकणार असल्याचं म्हणत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी शड्डू ठोकलायं. छत्रपती राजाराम साखर कारखान्यावर एकहाती वर्चस्व मिळाल्यानंतर महादेवराव महाडिकांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलंय.
राऊतांच्या तोफेने राहुल कुल यांना भरणार धडकी; उद्या होणार भव्य सभा
महाडिक म्हणाले, मी शेलार मामा सारखा माणूस, माझ्या रांगेत कोणीही बोटी घालण्याचं काम करु नये, माझ्या जवळपास येण्यासाठी तुम्हाला अजून उन्हाळे पावसाळे पहावे लागणार आहेत. सर्वात आधी माझे छोटे-छोटे अमल आणि धनंजय महाडिकांना सलामी द्या मग पुढे बाकीचं बघू, या शब्दांत खुलं चॅलेंजच विरोधकांनी दिलं आहे.
तसेच ज्यांना शड्डू मारता येत नाही त्याला निवडणूक रिंगणात उतरवलंय, मी शेलारमामा सारखा, माझ्या जवळपास आल्यास फुकून उडवून टाकणार असल्याचं माजी आमदार महाडिक यांनी स्पष्ट केलंय. तसेच या निवडणुकीत आम्ही चालता चालता हात फिरवला अन् विरोधकांना चीतपट केल्याचं महाडिक म्हणाले आहेत.
कुणाल कामरांनी IT नियमांना दिलेले आव्हान योग्यच; खंडपीठाचा केंद्र सरकारला मोठा झटका
राजाराम कारखान्याचा विजय हा सर्वसामान्य प्रामाणिक सभासदांचा असून या विजयाचं श्रेय अमल महाडिक आणि धनंजय महाडिकांना जात आहे. हा कारखाना गरीब शेतकऱ्यांचा असून आजच्या निकालानंतर कोल्हापूरच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळणार असल्याचेही संकेत त्यांनी यावेळी दिलेत. कावळ्याने शाप दिला म्हणून कधी ढाई मोडते का? असा सवाल करीत त्यांनी विरोधकांना डिवचलं आहे. महाडिकांच्या जवळ गोरगरीब जनतेची ताकद असून माझ्यासोबत सर्वसामान्य जनतेची शक्ती असल्याचंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत 9 पैकी 6 गटांत महाडिक गटाने बाजी मारली आहे. तर एकूण 5 फेऱ्यांमध्ये महाडिक गटाचे 13 उमेदवार आघाडीवर आहेत. दरम्यान, कारखाना निवडणुकीसाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटीलआणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कोल्हापुरकरांना निकालाची उत्सुकता लागल्याने अखेर आज निकालाचं चित्र स्पष्ट झालं असून सतेच पाटील यांच्या विरोधी परिवर्तन पॅनेलचा धुव्वा उडाला आहे.