‘भाजप अन् काँग्रेसला निधी देणं सावंतांच्या अंगलट’; CM शिंदेंचा आरोग्यमंत्र्यांना मोठा दणका

CM Ekanath Shinde and Tanaji Sawant :  राज्य विधानसभेच्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात शिंदे गट व अजित पवारांच्या गटाला भरघोस निधी दिला असल्याची माहिती आहे. असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे मानले जाणारे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी परभणी जिल्ह्याला दिलेला 150 कोटींच्या निधीला शिंदेंनीच स्थगिती दिली आहे. तानाजी सावंत हे परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. […]

Letsupp Image   2023 07 26T124551.340

Letsupp Image 2023 07 26T124551.340

CM Ekanath Shinde and Tanaji Sawant :  राज्य विधानसभेच्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात शिंदे गट व अजित पवारांच्या गटाला भरघोस निधी दिला असल्याची माहिती आहे. असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे मानले जाणारे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी परभणी जिल्ह्याला दिलेला 150 कोटींच्या निधीला शिंदेंनीच स्थगिती दिली आहे.

तानाजी सावंत हे परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. सावंत यांच्यावर शिंदे गटाच्या नेत्यांना डावलून भाजप व विरोधी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना निधी दिल्याचा आरोप होत आहे. यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी सावंत यांनी मंजूर केलेल्या 150 कोटींच्या कामांना स्थगिती दिली आहे.

‘ही कसली मुलाखत ही तर जळजळ, मळमळ अन् अपचनाचे करपट ढेकर’; शेलारांचा ठाकरेंवर पलटवार

सावंत यांनी मागील आठवड्यात जिल्हा नियोजन समितीच्या 150 कोटींच्या विविध विकास कामांना मंजुरी दिली. त्यात भाजप, काँग्रेससह इतर पक्षांच्या नेत्यांना हा निधी वाटप करण्यात आला. तसेच ज्या कामांना मंजुरी देण्यात आली त्याच्या याद्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे देण्यात आल्या.

शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रवीण देशमुख व अन्य नेत्यांनी या प्रकरणी सत्ताधारी शिवसेनेवर अन्याय झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सावंत यांच्यावर निधी वाटपात आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर अन्याय केल्याचा आरोप केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रकरणी परभणीचे जिल्हाधिकारी रघुनात गावडे यांच्याशी चर्चा केली. तसेच ही कामे काही दिवसांसाठी थांबवण्याचेही निर्देश दिले.

41 हजार कोटींचं नियोजन कसं? अजित पवारांनी विधानसभेत सांगितलं

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार रखडला असल्यामुळे शिंदे गटाचे आमदार नाराज असल्याचे बोलले जात होते. तसेच राष्ट्रवादीच्या आमदारांना गेल्या वर्षभरात निधी मिळाला नसल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात येत होता. त्यानंतर मात्र, आता शिंदे गट व अजित पवारांच्या गटाला भरघोस निधी मिळाला असल्याची माहिती आहे.

Exit mobile version