Download App

दिल्लीतून राष्ट्रवादी होणार बेघर; राष्ट्रीय दर्जा गेल्यानंतर आणखी एक संकट..

NCP News : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतल्याच्या मोठ्या धक्क्यानंतर आणखी एक झटका पक्षाला बसण्याची शक्यता आहे. कारण राजधानी दिल्लीत पक्षाला मिळालेला बंगला काढून घेतला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दिल्ली सरकारकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि सीपीआय या पक्षांना तशी नोटीस बजावली जाण्याचीही शक्यता असल्याची माहिती आहे.

दोन्ही पक्षांना मिळालेले मिळालेले बंगले काढून घेण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच दिल्लीतील बंगलेही हातचे जाण्याची चिन्हे निर्माण झाल आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस आणि सीपीआय आणि तृणमूल काँग्रेसला देण्यात आलेली जमीनही गमवावी लागू शकते. पक्ष  कार्यालय बांधण्यासाठी ही जमीन दिली होती. राष्ट्रवादीने दिल्लीत भूखंडाची मागणी केली होती. काही जमिनी पाहिल्या होत्या. मात्र, जमीन पसंत न पडल्याने पक्ष कार्यालय बांधता आले नाही. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसला एका ठिकाणी जागा मिळाली होती.

Ramesh Bais : महाराष्ट्राला पुन्हा नवे राज्यपाल? रमेश बैस सक्रिय राजकारणात परतणार

मात्र, येथे काही अतिक्रमणे असल्याने नऊ वर्षांनंतरही पक्षाला या जागेचा ताबा घेता आला नव्हता. आता तर पक्षाचा राष्ट्रीय दर्जाच रद्द झाला आहे.  त्यामुळे हा भूखंडही जाण्याची दाट शक्यता आहे. हा भूखंड पक्षाला मिळण्याची शक्यता फार कमी आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसनेही जर वेळीच भूखंड ताब्यात घेतला असता तर आता त्या ठिकाणी पक्ष कार्यालय बांधता आले असते. आता राष्ट्रवादीचाही राष्ट्रीय दर्जा काढून घेण्यात आला आहे.

भाजप-मनसे युती होणार का ? ; फडणवीसांचे सूचक वक्तव्य म्हणाले, हिंदुत्वावर आमचे..

भारतीय कम्युनिस्ट पक्षाबद्दल बोलायचे झाले तर त्यांचे दिल्लीत आधीपासूनच कार्यालय आहे. कोलकाता मार्गावरील अजोय भवन येथे सीपीआयचे कार्यालय आहे. हे  कार्यालय पक्षाकडेच राहणार आहे. मात्र, पक्षाच्या सरचिटणीसांना देण्यात आलेला सरकारी बंगला सोडावा लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसलाही कॅनिंग रोडवर पक्ष कार्यालयासाठी देण्यात आलेला बंगला सोडावाच लागणार आहे.

 

 

Tags

follow us