Download App

कोण नरेश म्हस्के ?, त्यांंच्या फालतु स्टेटमेंटला मी.. म्हस्केंच्या आरोपांवर अजितदादांचा संताप

Ajit Pawar : जानेवारी महिन्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत आमदार रोहित पवार विजयी झाले होते. मात्र, या निवडणुकीत रोहित पवार यांना पाडण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केला होता असा खळबळजनक गौप्यस्फोट ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर मोठा वाद होण्याची चिन्हे दिसत असून या वादाला सुरुवातही झाली आहे. म्हस्केंच्या या वक्तव्यावर खुद्द अजित पवार यांनी भाष्य केले आहे.

रोहित पवारांच्या पराभवासाठी अजित पवारांनी जीवाचे रान केले, नरेश म्हस्केंचा आरोप

अजित पवार म्हणाले, ‘कोण नरेश म्हस्के? मी त्यांना ओळखत नाही. असल्या फालतू स्टेटमेंट करणाऱ्यांना मी महत्त्व देत नाही. आम्ही असे घरामध्ये पण वागत नाही. जी माझी भूमिका असते त्यावर मी कायम ठाम असतो. रोहित पवार माझ्या कुटुंबातील एक घटक आहेत. तो माझा पुतण्या आहे’, अशा शब्दांत अजित पवार यांनी मत व्यक्त केले.

माथी भडकवणाऱ्यांना बळी पडू नका 

संभाजीनगर येथील दंगल प्रकरणात पवार म्हणाले,  ‘मी काल आवाहन केलं आहे की दंगल कोणी घडवून आणण्याचा प्रयत्न करत असेल तर असं होऊ नये. जरी मी विरोधी पक्षात असलो तरी कुठल्या ही प्रकारचे वक्तव्य होऊ देणार नाही की ज्यामुळे वातावरण बिघडेल. सगळ्यांनी शांतता प्रस्थापित करायला हवी. मी पुन्हा आवाहन करेल की कृपया माथी भडकून देण्याचे काम केलं तर त्याला कोणी ही बळी पडू नका.’

‘महाविकास आघाडीची सभा शहरात होत आहे. एकटा अजित पवार याबाबत निर्णय घेत नाही इतर नेते देखील निर्णय करतात. मी काही बोललो तर ब्रेकिंग न्युज तयार होईल कारण तिथे सगळे नेते तयारी करत आहेत. ठरलेले कार्यक्रम व्हायला पाहिजेत असे मला वाटते.’

Sushama Andhare यांची तक्रार दाखल करून न घेणे दुर्देवी, चाकणकर गृहविभागावर नाराज

काय म्हणाले म्हस्के ?

जानेवारी महिन्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची निवडणूक झाली होती. या निवडणुकीच्या काळात रोहित पवारांना पाडण्यासाठी पवार कुटूंबातील एक व्यक्ती अनेकांना फोन करत होती. ती दुसरी तिसरी कोणी नसून अजित पवार होते. काल नाशिकमधील जाहीर सभेत विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना नरेश म्हस्केंनी हा आरोप केला.

‘अजित पवार साहेब आगोदर आपलं बघा मग मुख्यमंत्र्यांवर टीका करा. तुम्ही रोहित पवारांना पाडण्यासाठी कोणाकोणाला फोन केले. हे जनतेला सांगा मग आमच्यावर टीका करा,’ असे म्हस्के म्हणाले होते.

 

Tags

follow us