‘राजकारणी अनेक ठिकाणी मारतात डोळे, त्यांचे त्यांनाच माहित’ ; अमृता फडणवीसांचा रोख कुणाकडे ?

Amruta Fadnavis : राज्याच्या राजकारणात रोज नवनव्या गोष्टी घडत असतात. विरोधी पक्षात असले तरी नेत्यांच्या मैत्रीचे किस्सेही नेहमीच ऐकायला मिळतात. काहींची मैत्री तर अशी असते की थेट सरकार स्थापन करण्यापर्यंत घडामोडी घडतात. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील मैत्रीही कधीतरी दिसत आहे. आज याच मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (51)

Amruta Fadnavis

Amruta Fadnavis : राज्याच्या राजकारणात रोज नवनव्या गोष्टी घडत असतात. विरोधी पक्षात असले तरी नेत्यांच्या मैत्रीचे किस्सेही नेहमीच ऐकायला मिळतात. काहींची मैत्री तर अशी असते की थेट सरकार स्थापन करण्यापर्यंत घडामोडी घडतात. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील मैत्रीही कधीतरी दिसत आहे. आज याच मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली.

याबाबत आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची मैत्री खरेच इतकी जवळची आहे का, असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना फडणवीस म्हणाल्या, याबद्दल त्या दोघांनाच जास्त माहिती आहे. जसे राजनेता असतात. त्यांची खूप लोकांशी जवळीक असते. अनेक ठिकाणी ते डोळे मारतात तेव्हा मला माहिती नाही की कोण कुठे डोळे मारतं.

काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान विधिमंडळाबाहेर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी डोळा मारल्याचा प्रसंग घडला होता. त्यावेळी या प्रसंगांची मोठी चर्चा झाली होती. फडणवीस यांनी प्रतिक्रिया म्हणजे या घटनेवर अजित पवार यांना टोला लगावल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Nana Patole : अजित पवारांनी नेमका डोळा कुणाला मारला?; नाना पटोलेंनी दिलं उत्तर

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधीमंडळ परिसराच्या आवारात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बोलत असताना डोळा मारल्याचा व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओची बरीच चर्चादेखील झाली होती. एवढेच काय तर, यातून अनेक अर्थ देखील काढण्यात आले होते.

Exit mobile version