Download App

संजय राऊतांकडून रश्मी शुक्लांना हटवण्याची मागणी; भाजप आमदार नितेश राणेंकडून जोरदार पलटवार

या आरोपांवर भाजपचे नेते नितेश राणे यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले. "जर तुम्ही निवडणूक पारदर्शकपणे लढवत असाल, लोकशाही

  • Written By: Last Updated:

Nitesh Rane criticizes Sanjay Raut : महाविकास आघाडीतील नेत्यांचे फोन टॅप केले जात असल्याच्या आरोपावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी हे आरोप करत, राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी राऊतांना तीव्र प्रत्युत्तर दिलं आहे.

राऊतांचा आरोप

महाविकास आघाडीतील नेत्यांचे फोन अजूनही टॅप केले जात असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे. त्यांनी शुक्ला यांच्या नियुक्तीला बेकायदेशीर संबोधल आहे. तसंच, ‘रश्मी शुक्ला यांच्या आदेशांखाली आम्हाला त्रास देण्यासाठी विविध पद्धतींचा वापर केला जात आहे’ असंही राऊत म्हणाले आहेत. निवडणूक आयोगाला विनंतीही त्यांनी केली आहे. “हजारो लोकांची मतदान प्रक्रिया रश्मी शुक्लांच्या नेतृत्वात निवडणुकीदरम्यान कशी पार पडेल, हे त्यांनी तपासावं असं राऊत म्हणालेत” त्याचबरोबर राऊत यांनी शुक्लांच्या नियुक्तीमागे देवेंद्र फडणवीसांचा हात असल्याचा थेट आरोप केला आहे.

भाजपकडून उमेदवारांना 15 ते 20 कोटी रुपये पोहोचले, संजय राऊतांचा गंभीर आरोप

काय म्हणाले नितेश राणे?

या आरोपांवर भाजपचे नेते नितेश राणे यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले. “जर तुम्ही निवडणूक पारदर्शकपणे लढवत असाल, लोकशाही पद्धतीने काम करत असाल, तर रश्मी शुक्लांच्या नियुक्तीवर एवढा विरोध का?” असा सवाल राणे यांनी राऊतांना केला. त्यांनी राऊतांवर थेट टीका करत म्हटले, “रश्मी शुक्ला यांच्या नावामुळे राऊतांची झोप उडालीय.” राणे यांनी शुक्लांना ‘कर्तव्य दक्ष अधिकारी’ म्हणून गौरवले व पुढे म्हटले की, “रश्मी शुक्ला कोणाच्याही बाजूने पक्षपाती काम करत नाहीत. त्यांच्यावर झालेले आरोप असत्य आहेत, आणि त्यांना हटवण्याची मागणी अनावश्यक आहे.”

भाजप आणि शिवसेनेत प्रतिवाद

हे प्रकरण केवळ रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीवर थांबलेले नाही, तर भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यातील राजकीय संघर्ष अधिकच उग्र झाला आहे. महाविकास आघाडीतील नेते म्हणतात की, फडणवीस सरकारच्या आदेशानुसार शुक्ला महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे, भाजपने नेहमीच शुक्लांच्या कारभाराला पाठिंबा दिला आहे व त्यांना कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून संबोधले आहे.

follow us