Download App

राष्ट्रवादी अजित पवारांकडून पहिली यादी जाहीर; राजकारणातून निवृत्ती घेतलेल्या आमदाराला उमेदवारी

बीड जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली असून दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये,

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar NCP first list Announced :आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत राजकारणातून निवृत्ती जाहीर केलेल्या प्रकाश सोळंके यांना अजित पवारांनी मैदानात उतरवलं आहे. योग्य वयात निवृत्त व्हायला पाहिजे, असं आमदार प्रकाश सोळुंके यांनी शरद पवारांना उद्देशून म्हटलं होतं. मात्र, आज त्यांचं नाव यादीत जाहीर झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

बीड जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली असून दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये, परळी मतदारसंघातून धनंजय मुंडेंची उमेदवारी जाहीर झाली आहे. तर, माजलगाव मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांना तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे, राजकारणातून निवृत्ती घोषित केलेल्या नेत्यालाही अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. बीडमधील माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली होती.

मोठी बातमी : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; बाजी मारण्यासाठी अजितदादांसह 38 शिलेदार मैदानात

प्रकाश सोळंके आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील गावांचे दौरे करत होते. त्याचवेळी त्यांनी यंदाची विधानसभा लढवणार नसल्याची घोषणा केली. तसेच, आपले राजकीय वारसदार म्हणून त्यांचा पुतण्या जयसिंह सोळंके यांच्या नावाची घोषणा देखील त्यांनी केली होती. दरम्यान, 2019 महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. पण, त्यावेळी मंत्रीपदाची माळ प्रकाश सोळंकेंच्या गळ्यात पडली नाही. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती.

पुढे अनेक दिवस सोळंके यांचं ‘राजीनामा नाट्य’ सुरू होतं. पण, त्यांना मंत्रीपद मिळालं नाही. अखेर त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी मतदारसंघात कामं करायला सुरुवात केली होती. मात्र, 2024 ची विधानसभा लढवणार नसून राजकीय निवृत्ती घेत असल्याची घोषणा त्यांनी केली होती. परंतु, अजित पवार यांच्याकडून आज त्यांच्या नावाची पुन्हा एकदा माजलगाव मतदार संघासाठी उमेदवार म्हणून घोषणा झाली आहे. स्वत: प्रकाश सोळंके काय भूमिका घेतात हे महत्वाचं ठरणार आहे.

follow us

संबंधित बातम्या