मोठी बातमी : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; बाजी मारण्यासाठी अजितदादांसह 38 शिलेदार मैदानात

  • Written By: Published:
मोठी बातमी : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; बाजी मारण्यासाठी अजितदादांसह 38 शिलेदार मैदानात

मुंबई  : विधानसभा निवडणुकांसाठीअजित पवारांक़डून (Ajit Pawar) पहिली यादी जाहीर करण्यात आली असून, यात 38 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा समावेश असून, स्वतः अजित पवार बारामतीमधून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. पिंपरीतुन राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, मावळमधून सुनील शेळके आणि येवल्यातून छगन भुजबळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, धनंजय मुंडे यांना परळीतून, दिलीप वळसे पाटील यांना आंबेगावमधून आशुतोष काळे यांना कोपरगावमधून उमेदवारी देण्यात आली आहे. (Ajit Pawar Announced Candidate List For Assembly Election)


कुणा -कुणाला मिळाली उमेदवारी?

– बारामती- अजित पवार
– येवला- छगन भुजबळ
– आंबेगाव- दिलीप वळसे पाटील
– कागल- हसन मुश्रीफ
– परळी- धनंजय मुंडे
– दिंडोरी- नरहरी झिरवाळ
– अहेरी- धर्मरावर बाबा अत्राम

CM शिंदेंच्या तिकीटवाटपात ‘भावकी’ जिंकली, कुठे भाऊ मुलगा तर कुठे भाऊ; वाचा खास रिपोर्ट..

– श्रीवर्धन-  आदिती तटकरे
– अंमळनेर- अनिल भाईदास पाटील
– उदगीर- संजय बनसोडे
– अर्जुनी मोरगाव- राजकुमार बडोले
– माजलगाव- प्रकाश दादा सोळंके
– वाई- मकरंद पाटील
– सिन्नर- माणिकराव कोकाटे
– खेड आळंदी – दिलीप मोहिते पाटील
– अहमदनगर  शहर- संग्राम जगताप

काटे, कलाटे की नखाते, शरद पवारांच्या मनात कोण? नानांनी सांगितला भेटीचा वृत्तांत

– इंदापूर- दत्तात्रय भरणे
– अहमदपूर- बाबासाहेब पाटील
– शहापूर- दौलत दरोडा
– पिंपरी- अण्णा बनसोडे
– कळवण- नितीन पवार
– कोपरगाव- आशुतोष काळे
– अकोले – किरण लहामटे
– वसमत- चंद्रकांत उर्फ राजू नवघरे
– चिपळूण- शेखर निकम
– मावळ- सुनील शेळके
– जुन्नर- अतुल बेनके

‘मविआ’ चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरेंना मिळणार ‘इतक्या’ जागा

– मोहोळ- यशवंत माने
– हडपसर- चेतन तुपे
– देवळाली- सरोज आहिरे
– चंदगड – राजेश पाटील
– इगतुरी- हिरामण खोसकर
– तुमसर- राजे कारमोरे
– पुसद -इंद्रनील नाईक
– अमरावती शहर- सुलभा खोडके
– नवापूर- भरत गावित
– पाथरी- निर्मला विटेकर
– मुंब्रा-कळवा- नजीब मुल्ला

उद्धव ठाकरेंना धक्का! ऐन निवडणुकीच्या तोंडावर पोहरादेवी महंतांचा जय महाराष्ट्र; नाराजीही उघड

नाराज टिंगरे मुंबईकडे रवाना

जाहीर करण्यात आलेल्या यादीत पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांच्या नावाचा समावेश नाहीये. त्यामुळे नाराज टिंगरे तातडीने पुण्याहून मुंबईला अजित पवार यांच्या भेटीसाठी रवाना होणार असल्याचे सांगिले जात आहे. पहिल्या यादीत जरी टिंगरे यांचे नाव नसले तरी, राष्ट्रवादीच्या यादीत वडगाव शेरीतून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे टिंगरे यांना वेटिंगवर ठेवण्यात आले आहे की, त्यांच्याजागी कुणा दुसऱ्याला उमेदवारी जाहीर होणार याचा सस्पेन्स कायम असून, पुढील यादीत टिंगरे यांना उमेदवारी जाहीर होते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Mahrashtra Assembly Election : भुजबळांचे घर फुटणार ? आधी राजीनामा द्या, अजितदादांची आक्रमक भूमिका

अहमदनगरमधून तिघांना संधी 

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत एकूण 38 उमेदवारांचा समावेश असून यामध्ये नगर जिल्ह्यातील आमदार आशुतोष काळे यांना कोपरगाव, अकोलेचे डॉ. किरण लहामटे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर, अहमदनगर शहरातून आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube