Download App

तब्बल 36 तास नॉट रिचेबल; शिंदे गटाचे श्रीनिवास वनगा अखेर घरी परतले, पण पुढच्या तासाभरातच…

श्रीनिवास वनगा यांचे दोन्ही मोबाईल फोन सोमवारी संध्याकाळपासून नॉट रिचेबल लागत होते. वनगा यांच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत

  • Written By: Last Updated:

 Shrinivas Vanga :  उमेदवारी न मिळाल्यामुळे दुखावलेले शिंदे गटाचे पालघर विधानसभा (Shrinivas Vanga) मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा हे सोमवारी संध्याकाळपासून बेपत्ता होते. अखेर 36 तास उलटल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांना फोन करुन आपण सुखरुप असल्याचं सांगितले. त्यानंतर श्रीनिवास वनगा हे पालघरमधील आपल्या घरीही आले होते. घरी आल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांशी काहीवेळ बातचीत केली. त्यानंतर श्रीनिवास वनगा हे कुटुंबीयांना सांगून पुन्हा घराबाहेर पडले.

श्रीनिवास वनगा यांचे दोन्ही मोबाईल फोन सोमवारी संध्याकाळपासून नॉट रिचेबल लागत होते. वनगा यांच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत असल्याचं त्यांच्या पत्नीने सांगितलं होतं. त्यामुळे वनगा यांचं कुटुंबीय चिंतेत होते. अखेर मंगळवारी रात्री उशीरा श्रीनिवास वनगा कोणालाही पत्ता लागून न देता घरी आल्याचं सांगितलं जातं. प्राथमिक माहितीनुसार, श्रीनिवास वनगा हे रात्री दोन ते तीनच्या दरम्यान घरी आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांची ही संपर्क साधल्याचं समजते. ते रात्री त्यांच्या मित्रांसोबत गेले आहेत असं त्यांच्या पत्नीने सांगितलं असून ते व्यवस्थित असल्याचंही सांगितलं आहे.

गणेश मंडळांच्या आक्रमक भूमिकेनंतर महापालिका झुकली; बालन यांना काढलेली 3 कोटीच्या दंडाची नोटीस स्थगित

सोमवारी संध्याकाळपासून ते आपल्या एका मित्राच्या घरी होते. ते सध्या प्रचंड डिप्रेशनमध्ये आहेत. शांत झाल्यावर ते घरी आले. आमच्याशी बोलून ते पुन्हा घराबाहेर पडले, अशी माहिती श्रीनिवास वनगा यांच्या पत्नीने दिली. मात्र, वनगा पुन्हा कुठे गेले, याबद्दल त्यांच्या कुटुंबीयांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

शिंदे गटाने श्रीनिवास वनगा यांच्याऐवजी पालघर विधानसभेतून  राजेंद्र गावित यांना संधी दिली होती. श्रीनिवास वनगा यांनी सुरतच्या बंडावेळी एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती. त्यामुळे आपल्याला पुन्हा उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा त्यांना होती. परंतु, शिंदे गटाने राजेंद्र गावित यांचे नाव जाहीर केल्यानंतर श्रीनिवास वनगा यांनी पत्रकारपरिषद घेऊन नाराजी व्यक्त केली होती. ‘उद्धव ठाकरे हे देवमाणूस होते. मी घातकी माणसासोबत गेलो आणि माझा घात झाला’, असे श्रीनिवास वनगा यांनी म्हटले होते.

follow us