Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकीचं सध्या वार वाहतय. अशा वातावरणात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट सत्ता स्थापनेबाबत वक्तव्य केलं आहे. तसंच, यावेळी त्यांनी कुणाला किती जागा मिळणार याबद्दलही त्यांनी वक्तव्य केलं आहे. त्याचबरोबर देवेद्र फडणवीस महाराष्ट्रात राहणार की दिल्लीला जाणार यावरही ते बोलले आहेत.
विधानसभेचा निकाल लागल्यानंतर जर गरज पडली तर कुणाला सोबत घेणार? असा प्रश्न विचारला असात फडणवीस म्हणाले आम्ही आमचे सहकारी एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांचा राष्ट्रवादी यांनाच सोबत घेऊन सत्ता स्थापण करणार आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी भाजप हा सर्वात मोठा पक्ष असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
Devendra Fadnavis : विधानसभेनंतर सर्वात मोठा पक्ष कोणता?, फडणवीसांनी थेट आकडेच सांगितले
यावेळी फडणवीस यांनी मराठवाड्यात आमची कामगिरी रिपीट करु, आम्हाला मराठा समाजानं मतदान दिलं नाही, हे सांगितलं जातं. त्यांना माझा साधा प्रश्न आहे ज्याांना मराठे मत देणार नाहीत त्यांना 43 टक्के मतं मिळू शकतात का? असा प्रश्न उपस्थित करत आम्हाला मराठा समाजानं मत दिलं, ओबीसी समाजानं मत दिलं. सर्वांनी मत दिलं असंही फडणवीस म्हणाले आहेत.
पवारसाहेब चार वेळा मुख्यमंत्री बनले. त्यांनी आरक्षण दिलं नाही. त्यानंतरच्या तीस वर्षात साडेचार वर्षांचा कालावधी सोडला तर सतत काँग्रेसचं सरकार होतं. त्यांनी कधीही मराठा आरक्षण दिलं नाही. पहिल्यांदा मराठा आरक्षण मी मुख्यमंत्री असताना दिलं. मी मुख्यमंत्री असेपर्यंत हायकोर्टात आम्ही जिंकलो. सुप्रीम कोर्टात आम्ही टिकवलं. त्यानंतर पुन्हा शरद पवार, उद्धव ठाकरे यांचं सरकार आलं. त्यांनी आरक्षण घालवलं असंही फडणवीस म्हणाले आहेत.