Rahul Narvekar on MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी निकाल दिला. मात्र शिंदे आणि ठाकरे गटाकडून या निकालावर नाराजी व्यक्त करण्यात आली. यानंतर शिंदे गटाने उच्च न्यायालयात तर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केल्या आहेत. या यावर आता राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. नार्वेकर यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली.
कुणालाही खुश करण्यासाठी हा निकाल दिलेला नाही. यावर कुणी जर न्यायालयात जात असेल तर तो त्यांचा हक्क आहे. पण फक्त याचिका दाखल केली म्हणजे मी दिलेला निकाल अयोग्य ठरत नाही. हा निकाल अयोग्य ठरवायचा असेल तर यामध्ये नियमबाह्य, घटनाबाह्य किंवा बेकायदेशीर काही असेल तर सिद्ध करावे लागेल. तसे सिद्ध केले तरच निर्णय माघारी घेतला जाऊ शकतो, असे राहुल नार्वेकर म्हणाले.
आमदारकी वाचवली, CM पद सेफ केले.. तरीही शिंदेंनी नार्वेकरांना कोर्टात खेचले, नेमके कारण काय?
कायद्याला धरूनच निकाल दिला आहे. कायदा आणि संविधानातील तरतुदींचे पालन करून आणि सर्वोच्च न्यायालयाच्या तत्वांच्या आधारावर निकाल दिला आहे. तरीही आपल्या देशात कुणीही न्यायालयात दाद मागू शकतो, असेही नार्वेकर म्हणाले.
दरम्यान, नार्वेकरांनी सुरूवातील विधानसभा अध्यक्षांनी खरी शिवसेना कोणाची यावर निर्णय दिला होता. यावेळी नार्वेकरांनी निर्मयम देतांना सांगितलं की, दोन्ही गटाच्या नेत्यांनी खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला. मात्र, दोन्ही गटांनी वेगवेगळ्या घटना दिल्या. उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या घटनेवर तारखेचा उल्लेख नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेली घटना मान्य करण्यात आली. यावरही तारीख नव्हती. निवडणूक आयोगाकडे 1999 च्या संविधानाची प्रत होती. त्यामुळे 2018 मध्ये केलेल्या बदलांचा विचार करण्यात आला नाही. ठाकरे गटाने 2018 मध्ये केलेली दुरुस्ती चुकीची असल्याचे नार्वेकर यांनी म्हटले होते.
ठाकरे अन् शिंदे गटाचे आमदार पात्र; राहुल नार्वेकरांनी दिला ऐतिहासिक निकाल