Devendra Fadnavis Press Conference : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील अकरा मतदारसंघात मतदान होत आहे. यातील बारामती मतदारसंघाची राज्यभरात चर्चा आहे. आज मतदानाच्या दिवशीच अजित पवार, सुनेत्रा पवार यांच्यासह सुप्रिया सुळे, शरद पवार या पवार कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावला. पण, या मतदानानंतर सुप्रिया सुळे यांनी तडक अजितदादांच घर गाठलं. यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक चर्चा सुरू झाल्या. या चर्चांनंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली.
शिंदे गटाचे नेते खासदार राजेंद्र गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी या राजकारणावर भाष्य केलं. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर फडणवीस म्हणाले, याला मी फक्त इमोश्नल टॅक्टिक्स म्हणेल. निवडणुकीत भावनिक स्ट्रॅटेजी असतात त्यापैकी हा एक भाग आहे. यापेक्षा मी जास्त टिप्पणी करणार नाही. शेवटी ते भाऊ बहिण आहेत. सुप्रिया सुळे घरी का गेल्या याची माहिती नंतर समोर येईल.
Devendra Fadnavis On Sharad Pawar: मोदीजी शरद पवारांसाठी धोका, देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात
सकाळी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर अजितदादांनी मेरी माँ मेरे साथ है! असे विधान केले. यावरही फडणवीसांनी भाष्य केले. ते म्हणाले की, अजितदादांनी फार चांगलं उत्तर दिले आहे. कारण शेवटी आई असणं आणि आई पाठिशी असणं यापेक्षा मोठा आशीर्वाद काय असू शकतो. अजितदादा एकटे पडले आहेत, परिवाराने त्यांना वाळीत टाकलं आहे असे चित्र जे निर्माण करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमिवर आईच्या आशीर्वादाशिवाय आणखी मोठं काय आहे. या पत्रकार परिषदेवेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात लढत होत असून, त्यांच्या अचानक भेटीमुळे अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता यावर भेटीवर सुळेंनी स्पष्टीकरण दिले आहे. काटेवाडीतील घर हे माझ्या काका काकींचं आहे. मोठ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी अजितदादांची भेट झाली का? असा प्रश्न विचारण्यात आला असता मी फक्त काकींटची भेट घेण्यासाठी आले होते असे स्पष्ट केले. यावेळी सुप्रिया सुळेंनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणींनादेखील उजाळा दिला.