‘बारामती’त पैशांचा पाऊस, विरोधकांकडून मतदारांना पोलीस बंदोबस्तात पैसे वाटप; रोहित पवारांचा गंभीर आरोप

‘बारामती’त पैशांचा पाऊस, विरोधकांकडून मतदारांना पोलीस बंदोबस्तात पैसे वाटप; रोहित पवारांचा गंभीर आरोप

Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र याच मतदारसंघातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या मतदारसंघात अगदी पोलीस बंदोबस्तात मतदारांना पैसे वाटप सुरू असल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या प्रकाराचा एक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. भोर तालुक्यातील हा व्हिडिओ आहे असा दावा त्यांनी केला आहे. रोहित पवार यांच्या या आरोपांनंतर मोठी खळबळ उडाली आहे.

या पैशांच्या वाटपामागे भोरमधील अजितदादा मित्रमंडळाचा पदाधिकारी आणि मावळ तालुक्यातील कार्यकर्ते आहेत असा दावा त्यांनी केला आहे. यासाठीच पाहिजे होती का Y दर्जाची सुरक्षा असा खोचक सवाल त्यांनी विचारला आहे. विचारांची कास सोडलेल्यांना दिवसा सामान्य लोकांची कामं करता येत नाहीत. मात्र बारामती मतदारसंघात निवडून येण्यासाठी रात्रभर जे उद्योग सुरू आहेत त्याचे काही व्हिडिओ. तरीही स्वाभिमानी मतदार विकला जाणार नाही. अपेक्षा आहे निवडणूक आयोग झोपेत नसेल आणि कायदेशीर कारवाई होईल, अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.

Baramati Loksabha : पिढीला जन्म देणारी सून बाहेरची कशी? अजितदादांचा शरद पवारांना टोला

बारामती मतदारसंघात आज मतदान होत आहे. या सोबतच राज्यातील अकरा मतदारसंघात मतदान सुरू झाले आहे. या मतदारसंघात हायहोल्टेज लढत आहे. महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या सुनेत्रा पवार यांच्यात लढत होत आहे. एका अर्थाने ही निवडणूक शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच होत आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी जोरदार प्रचार केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिली मोठी निवडणूक आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांसाठी ही निवडणूक महत्वाची ठरणार आहे. या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

मतदानादरम्यान कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यंदा प्रथमच बुरुडमल गावात विशेष मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. या गावात सर्वात कमी म्हणजे फक्त 41 मतदार आहेत. मतदारसंघात प्रशासनाने मतदानाची चोख व्यवस्था केली आहे. मतदारांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.

सुप्रिया सुळेंचं ‘एक’ मत वाढणार : शरद पवार 10 वर्षांनंतर पुन्हा झाले बारामतीचे मतदार

follow us
  • fb
  • instagram
  • youtube