Download App

खैरेंना वेड्यांच्या दवाखान्यात पाठवा; फडणवीसांवरील आरोपांना कराडांचे उत्तर

Bhagwat Karad on Chatrapati Sambhaji Nagar Riots :  छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा परिसरात जी दंगल झाली त्याचे जोरदार पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून विरोधी पक्षातील नेत्यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केले आहेत. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांना केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. कराड म्हणाले, की खैरे यांची वैद्यकिय तपासणी करण्याची गरज आहे.

रामनवमीच्या दिवशी किराडीपुरा येथील प्राचीन मंदिराजवळ जर कोणी असं केलं असेल तर त्याच्यावर कारवाई करावी, अशा सूचना मी पोलीस आयुक्तांना दिल्य आहेत.  खैरेंचा आरोप खोटा आहे. त्यामुळे त्यांची वैद्यकिय तपासणी करण्याची गरज आहे. तसेच ते जर यामागे देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचा आरोप करत असतील तर त्यांना वेड्याच्या रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे.

Nana Patole : ‘राज्यातील ‘नपुंसक’ ईडी सरकारने तात्काळ राजीनामा द्यावा’

महाविकास आघाडीची 2 एप्रिल रोजी शहरात सभा होणार आहे. ही सभा होऊ नये यासाठी भाजपाने हा कट रचल्याचा आरोप माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला होता. यावर कराड म्हणाले, की महाविकास आघाडीची सभा होणार हे आम्हाला माहित आहे. त्यांची सभा वेगळी आहे. त्याला रामनवमीच्या कार्यक्रमाशी जोडणे चुकीचे आहे. तसेच खैरे यांनी केलेले वक्तव्यवही बरोबर नाही. आम्ही अशा प्रवृत्तीच्या माणसाला खासदार म्हणून निवडून दिले याचे आम्हाला वाईट वाटते, असा टोला त्यांनी लगावला.

संजय राऊत म्हणत होते ते हेच दंगे का ? ; सोमय्यांकडून राऊत टार्गेट

खैरेंचा आरोप काय ?

छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडीपुरा भागातील राम मंदिराबाहेर हा प्रकार घडला. संतप्त जमावाने येथे जाळपोळही केली. मात्र, हा प्रकार पूर्वनियोजित होता. तसेच याचे खरे मास्टमाइंड देवेंद्र फडणवीस हेच आहेत, असा खळबळजनक आरोप  खैरे यांनी केला होता.

दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना लक्ष्य केले आहे. जलील यांनी केलेल्या भाषणाचा परिणाम युवकांवर झाला. त्यामुळे दंगल भडकली. दंगलीत अर्ध्या तासात पेट्रोल बॉम्ब कुठून आले ? असा सवाल करत आमचे शहर आतंकवादी लोकांच्या हिटलिस्टवर आहे.

आम्हाला शांतता भंग करायची नाही. मात्र ज्यांनी हे घडवून आणले आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी शिरसाट यांनी केली. यासंदर्भात आपण पोलीस आयुक्तांबरोबर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags

follow us