Maharashtra Bhushan Award Heat Stroke : राज्य सरकारच्या वतीने मुंबईतील खारघर येथे डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाला आलेल्या अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अजूनही काही लोक अत्यवस्थ असल्याने त्यांच्या भेटीसाठी रुग्णालयात नेतेमंडळी धाव घेऊ लागले आहे. मुख्यमंत्री शिंदेंपाठोपाठ उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांनी रुग्णांची विचारपूस केली. आता मनसेचे नेते राज ठाकरे हे सुद्धा रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेत त्याच्या स्वास्थ्याची विचारपूस करणार आहेत.
ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना शासनाच्या वतीने ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यासाठी खारघरमध्ये मोठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला लाखो लोकांनी हजेरी लावली होती. दरम्यान कडाक्याच्या उन्हात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांनंतर अनेकांना उष्मघाताचा त्रास जाणवू लागला. या रुग्णांना तातडीने एमजीएममध्ये दाखल करण्यात आले.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळयाला गालबोट, 11 जणांचा मृत्यू
मात्र उष्मघाताच्या त्रासामुळे आतापर्यंत अकरा जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण अद्यापही अस्वस्थ आहे. घटनेची गंभीरता पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने रुग्णालयात जात रुग्णांची भेट घेत विचारपूस केली. तसेच मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीची घोषणा देखील केली. दरम्यान नागपूरमधील सभा आटोपल्यानंतर तातडीने उद्धव ठाकरे, अजित पवार व आदित्य ठाकरे यांनी रुग्णालयात जात रुग्णांची विचारपूस केली.
नाट्य परिषद निवडणूक : प्रशांत दामलेंकडून कांबळींच्या सत्तेचे वस्त्रहरण
दरम्यान आता या ठिकाणी नेतेमंडळींची वर्दळ सुरु झाली आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील आता रुग्णांच्या भेटीस जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान या घटनेमुळे राज्यातील राजकारण देखील तापू लागलेआहे. कार्यक्रमाच्या आयोजनांवरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जात आहे. तसेच नेत्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करू लागले आहे.