पोलीस भरतीवेळी उमेदवारांचे मृत्यू; अजित पवार यांनी सरकारकडे केली ‘ही’ मागणी

Ajit pawar : पोलिस भरतीसाठी येणाऱ्या तरुणांच्या निवास, भोजनाची सोय करावी. त्यांना स्वच्छतागृहे उपलब्ध करुन द्यावीत. महिला उमेदवारांच्या सुरक्षेची विशेष काळजी घ्यावी. धावण्याच्या चाचणीवेळी उमेदवारांना त्रास होऊन त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या टाळण्यासाठी धावण्याची चाचणी पहाटे ४ ते सकाळी १० यावेळेत घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. अजित […]

24_10_2019 Ajit Pawar_19696689

24_10_2019 Ajit Pawar_19696689

Ajit pawar : पोलिस भरतीसाठी येणाऱ्या तरुणांच्या निवास, भोजनाची सोय करावी. त्यांना स्वच्छतागृहे उपलब्ध करुन द्यावीत. महिला उमेदवारांच्या सुरक्षेची विशेष काळजी घ्यावी. धावण्याच्या चाचणीवेळी उमेदवारांना त्रास होऊन त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या टाळण्यासाठी धावण्याची चाचणी पहाटे ४ ते सकाळी १० यावेळेत घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.

अजित पवार यांनी मुंबईसह (Mumbai) राज्यात पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. भरती केंद्रांवर तरुण मोठ्या संख्येने येत आहेत. त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची गैरसोय होत असल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अडचणी दूर केल्या पाहिजेत याकडे लक्ष वेधले.

हेही वाचा : जाहिरातबाजी थांबवा, आजारी एसटीच्या दुरुस्तीचे पाहा; अजितदादांनी सरकारला खडसावले

पोलिस शिपाई भरतीसाठी इंजिनियर, डॉक्टर, एमबीए, एमएससी झालेले तरुण येत आहेत. गावखेड्यातल्या शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची ही मुलं आहेत. उच्चशिक्षण घेऊनही नोकऱ्या नसल्याने हे तरुण पोलिस भरतीसाठी येत आहेत. त्यांची काळजी घेणे ही आपली शासनाची जबाबदारी आहे. मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसमध्ये भरतीच्या वेळी गणेश उगले या १७ वर्षांच्या तरुणाला १६०० मीटर धावल्यानंतर चक्कर आली आणि तो कोसळला.

Kasba By Election : तिथेच आर्धी लढाई जिंकलो, अजित पवारांनी सांगितलं कसब्यातील यशाचं रहस्य

त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. तिथे त्याचा मृत्यू झाला. मुंबईत भरतीसाठी आलेल्या अमर अशोक सोलंके या २७ वर्षांच्या तरुणाला, तो राहत असलेल्या हॉटेलमध्ये हार्टअ‍ॅटॅक आला आणि हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळली पाहिजे असेही अजित पवार म्हणाले.

भरती केंद्रांवर येणाऱ्या तरुणांची निवासाची सोय सभागृहात किंवा बंदिस्त ठिकाणी केली पाहिजे. अंघोळ व स्वच्छतागृहांची सोय असली पाहिजे. महिला उमेदवारांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली पाहिजे. वैद्यकीय उपचारांची सोय ठेवली पाहिजे. धावण्याची चाचणी आपण दुपारी भर उन्हात घेतो अशी विनंतीही अजित पवार यांनी केली.

Exit mobile version